Badlapur Youth Missing in Water for Four days Saam Tv News
क्राईम

Badlapur News : नदीवर मित्रांसोबत पार्टीला गेला, पाण्यात बुडून आशिष ४ दिवसांपासून बेपत्ता; आई-बापाचं आकांत

Badlapur Youth Missing in Water for Four days : आशिष हा २६ जून रोजी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी दहागावच्या नदीवर गेला होता. यावेळी तो पोहण्यासाठी नदीत उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला.

Prashant Patil

बदलापूर : बदलापूरजवळच्या दहागाव नदीवर मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आलेला तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडलीय. मात्र, ४ दिवस उलटूनही या तरुणाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे एनडीआरएफ आणि फायर ब्रिगेडकडून अजूनही शोधकार्य सुरू आहे. आशिष करोतीया असं या तरुणाचं नाव असून तो बदलापूर पश्चिमेला राहण्यास आहे. आशिष हा २६ जून रोजी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी दहागावच्या नदीवर गेला होता. यावेळी तो पोहण्यासाठी नदीत उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. तेव्हापासून सलग चार दिवस त्याचा शोध घेण्यासाठी NDRF आणि फायर ब्रिगेडकडून शोधकार्य सुरू आहे. मात्र, अजूनही त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळं त्याचे कुटुंबीय चिंतेत आहे.

श्वास कोंडला अन् बुडून मृत्यू; नाशिकमध्ये खळबळ

बांधकाम साईटवर तयार केलेल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. ही ह्रदयद्रावक घटना नाशिकमधून उघडकीस आली आहे. कालपासून तिन्ही अल्पवयीन मुले बेपत्ता होती. कृत्रिम तलावात बुडून तिन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तिघांचा मृतदेह तलावातून बाहेर काढले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तिघा मुलांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दुपारपासून तिन्ही मुलं बेपत्ता होती. त्यानंतर मृत मुलांच्या कुटुंबाने तिघांचा शोध घेण्यास सुरूवात केली. बिडी कामगार परिसारातील कृत्रिम तलावाच्या काठाजवनळ मुलांचे कपडे आढळले. त्यानंतर मुले पोहण्यासाठी गेली असावी अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी धाव घेत शोध मोहिमेला सुरूवात केली.

अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले. त्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कुटुंबाने हंबरडा फोडला. या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना देण्यात आली असून, त्यांनी या घटनेचा अधिक तपासाला सुरूवात केली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT