Hingoli Farmer: हिंगोलीच्या शेतकऱ्याची कमाल! तहानलेल्या मराठवाड्यात फुलवली सफरचंदाची बाग

Hingoli Farmer Success Story: हिंगोलीच्या शेतकऱ्याने सफरचंदाची शेती केली आहे. मराठवाड्यातील मागासलेल्या भागात त्यांनी सरफरचंदाची शेती करुन इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
Hingoli Farmer
Hingoli FarmerSaam Tv
Published On

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात अनेकजण शेती करतात. शेतीत अनेकदा पाण्याअभावी किंवा जमीन चांगली नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. परंतु नुकसान जरी झाले तरीही शेतकरी आपल्या शेतीत नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात.असाच प्रयोग हिंगोलीतील शेतकऱ्याने केला. शेतकऱ्याने सफरचंदाची बाग फुलवली आहे.

Hingoli Farmer
Success Story: AI च्या मदतीने अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात IAS, विभोर भारद्वाज यांचा प्रेरणादायी प्रवास

उराशी बाळगलेले स्वप्न आणि जिद्द पूर्ण करण्यासाठी हिंगोलीत एका शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी शेती केली आहे. निसर्गाची साथ आणि कष्टाला तोड नसली की शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ शकतो हे दाखवून दिलं आहे.

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा गावचे शेतकरी सदाशिव गवळी यांनी , एरवी काश्मीरमध्ये पिकणारी सफरचंदाची शेती चक्क मराठवाड्याच्या मागासलेल्या हिंगोली जिल्ह्यात फुलल्याने पंचक्रोशीत गवळी यांची सफरचंदाची शेती सगळ्यांसाठीच कुतूहलाचा विषय ठरली आहे. गवळी यांनी सफरचंदाची बाग फुलवण्यासाठी 99 क्रमांकाची हरिमन जातीची 450 झाडे लावत या बागेची सुरुवात केली होती.

Hingoli Farmer
Success Story: आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लेकीने क्रॅक केली UPSC; बस कंडक्टरची मुलगी झाली IPS

आता गवळी यांची सफरचंदाची बाग तोडायला आली असून बाजारपेठेत योग्य भाव मिळाला तर आपण मालामाल होईल अशी आशा शेतकरी सदाशिव गवळी यांना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन तूर उडीद मूग यासह हळद पिकाची शेती करणाऱ्या गवळी यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत सफरचंदाची बाग फुलवल्याने आता परिसरातील शेतकरी देखील त्यांचा आदर्श घेऊ लागले आहेत दररोज अनेक शेतकरी गवळी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी दाखल होत असून त्यांना शेतकरी सदाशिव गवळी मार्गदर्शन देखील करत आहेत.

Hingoli Farmer
Success Story: ब्युटी विथ ब्रेन! LLB केलं, छंद जपण्यासाठी संगीत विषयात MA, नंतर UPSC केली क्रॅक; IAS पल्लवी मिश्रा यांची यशोगाथा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com