Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात सर्व मसाल्यामध्ये हळद अत्यंत महत्वाचा मसाला आहे.
केवळ जेवणाचा रंगच नाही तर आरोग्यासाठीही हळद गुणकारी मानली जाते.
पूर्वीपासून आजारांवर उपाय म्हणून अँटी ऑक्सिडंट, अँटिसेप्टिक हळदीचा वापर केला जातो.
मात्र हळद भेसळयुक्त नाही ना हे ओळखायचं कसं ते जाणून घ्या.
सध्या बाजारात भेसळयुक्त हळदीचा वापर विक्रिसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे.
हळदकुंडावर प्रक्रिया करून हळद पावडर बनवली जाते.
भेसळयुक्त हळद तयार करण्यासाठी यामध्ये लेड क्रोमेट हे रसायन वापरलं जातं.
लेड क्रोमेट हे लेड आणि क्रोमियम धातूंच्या मिश्रणापासून बनते यामुळे हळदीला सोनेरी रंग येतो.
भेसळयुक्त हळदीमध्ये गहू किंवा तांदळाच्या पीठाचा देखील वापर केला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.