MHADA Lottery : कल्याण-ठाण्यात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, जुलैमध्ये ४००० घरांची लॉटरी निघणार, वाचा सविस्तर

MHADA Home Lottery For 4000 Home: स्वतः चे घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडा पुढच्या महिन्यात ४००० घरांची लॉटरी निघणार आहे.
MHADA Lottery
MHADA LotterySaam TV
Published On

मुंबईत घर घेणे हे सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर आहे. त्यामुळे म्हाडा दरवर्षी लॉटरी काढत असते. म्हाडा म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र प्राधिकरण लॉटरी जारी करत असते. म्हाडाने ठाणे,कल्याण, डोबिंवलीस विरारसह मुंबई महानगर (MMR) प्रदेशात लॉटरी काढण्याच्या तयारीत आहे. म्हाडा जवळपास ४००० घरांची लॉटरी काढू शकते.

MHADA Lottery
CIDCO Lottery: सिडकोची बंपर लॉटरी निघणार, कोण कोणत्या लोकेशनवर आहेत घरं?

पुढच्या महिन्यात निघणार लॉटरी

एफपीजे जर्नलच्या रिपोर्टनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाद्वारे ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे. जुलै महिन्यात ही लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांचे स्वतः चे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. मुंबईतील अनेक ठिकाणी ही घरे आहेत. त्यासाठी लॉटरी काढली जाणार आहे.

म्हाडाच्या लॉटरीत ठाणे, कल्याण आणि कोकण विभागात सर्वाधिक घरे असणार आहे. मुंबईबाहेरील भागात घरे घेण्याची मागणी वाढत आहेत. मुंबईतील अल्पउत्पन्न आणि मध्यम उत्तम उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना घरे खरे खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, ही लॉटरी म्हाडाच्या व्यापक धोरणाचा भाग आहे. पुढील दोन वर्षात राज्यभरात ३२००० नवीन घरे बांधण्याची योजना जाहीर केली आहे. ज्यामध्ये मुंबईत ७००० घरे बांधण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

MHADA Lottery
MHADA Homes: कल्याण- डोंबिवलीकरांसाठी खुशखबर, स्वस्तात मस्त घरं मिळणार; म्हाडाने सांगितला प्लान

कोणत्या ठिकाणी किती घरांसाठी लॉटरी?

२०२५-२६ मध्ये म्हाडाने संपूर्ण महाराष्ट्रात १९,७९४ घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यात मुंबईत ५,१९९ घरांचा समावेश आहे.यामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अर्थसंकल्पात प्रदेशनिहाय काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यात कोकण प्रदेशासाठी ९,९०२ घरे निश्चित केली आहे. पुण्यात १,८३६ घरे, छत्रपती संभाजी नगरमध्ये १६०८, नागपूरमध्ये ६९२, अमरावतीत १६९ तर नाशिकमध्ये ९१ घरे निश्चित करण्यात आली आहेत.

MHADA Lottery
MHADA Home : ठाण्यात अवघ्या 20 लाखांत स्वप्नातलं घर! म्हाडाकडून तब्बल ६२४८ घरांसाठी लॉटरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com