Andhra Pradesh two Software Engineer Dies After drinking Excessive Beer  Saam Tv
क्राईम

Crime News: १९ बाटल्या बिअर आणि दोन मित्र...; पार्टी गाजवली, मात्र 'ती' एक चूक महाग पडली, दोघांची जीवनयात्रा संपली

Crime News: आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांचा जास्त बिअर प्यायल्यानंतर जेवण खल्ल्याने गुदमरून मृत्यू झाला.

Shruti Vilas Kadam

Crime News: आंध्र प्रदेशातील अन्नामलाई जिल्ह्यात, जास्त प्रमाणात बिअर प्यायल्याने आणि अन्न त्यांच्या घशात अडकल्याने दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने गुदमरल्यामुळे आणि अन्न त्यांच्या घशात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अन्नामलाई जिल्ह्यातील बंदावद्दीपल्ली भागात ही घटना घडली. जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानंतर अन्न घश्यात अडकल्याने गुदमरुन दोन सॉफ्टवेअर अभियंतांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृत अभियंत्यांची ओळख पटवली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १७ जानेवारी रोजी चार मित्रांसोबत पार्टी करताना अनेक तास बिअर प्यायल्यानंतर मणि कुमार आणि पुष्पराज यांचा अचानक मृत्यू झाला.

पाच बाटल्यांहून अधिक बिअर प्यायले

घटनेची माहिती देताना, रायचोटीचे पोलिस उपअधीक्षक कृष्ण मोहन म्हणाले की, अन्नामलाई जिल्ह्यातील दोन सॉफ्टवेअर अभियंतांचा मित्रांसोबत पार्टी करताना अन्न घश्यात अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाला. त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी पार्टीसाठी १९ कॅन बिअर खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी दुपारी ३:३० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत प्यायले. कुमारने अंदाजे सहा कॅन बिअर प्यायले आणि पुष्पराजने पाच कॅन बिअर प्यायले.

अधिक माहिती देताना, डीएसपी म्हणाले की घरी परतताना कुमार बेशुद्ध पडला आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्या मित्रांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे त्याचा मृत्यू झाला. दुसरा मित्र, सॉफ्टवेअर इंजिनिअर पुष्पराज, रात्री १० च्या सुमारास मरण पावला.

घशात अन्न अडकल्याने गुदमरल्यासारखे झाले

पोलिसांच्या मते, कुमारने बिअर पिण्यापूर्वी मद्यपान केले होते. प्राथमिक तपासात असे दिसून आले की जास्त मद्यपान आणि घशात अन्न अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. १८ जानेवारी रोजी कुमारचे वडील नरसिंह यांनी तक्रार दाखल केली की मृत्यूचे कारण अज्ञात आहे. दरम्यान, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

डीएसपी म्हणाले की मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत आणि वापरलेल्या बिअरचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. चाचणीत बिअरमध्ये कोणत्याही प्रकारची अशुद्धता नसल्याचे माहिती मिळाली. तसेच मृतांचे रक्त आणि इतर नमुने देखील पुढील चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

पुणे ग्रँड टूरमध्ये अप्पांची धडाकेबाज एन्ट्री; वय ७०, जोश मात्र तरुणाला ही लाजवेल असा

तुमच्या महापालिकेत महापौर कोण? 29 महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

SCROLL FOR NEXT