Photograpgher Killed  Google
क्राईम

Crime News: १० लाखांच्या कॅमेऱ्यापुढे जीव झाला स्वस्त; २३ वर्षीय फोटोग्राफरची हत्या

Rohini Gudaghe

Young Photographer Killed For Camera

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणम येथे फोटोग्राफरची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या 23 वर्षीय व्यावसायिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यासाठी दोघांनी त्याची हत्या केली आहे. दोन जणांनी या फोटोग्राफरची हत्या करून त्याचा कॅमेरा आणि इतर साहित्य लुटल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.  (Latest Crime News)

आरोपींनी फोटो काढण्याचा बहाण्याने साई पवन कल्याण नावाच्या फोटोग्राफरला बोलावलं होतं. डॉ. बीआर आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील रावुलापलेमजवळ २६ फेब्रुवारीला धक्कादायक घटना (Photographer Killed) घडली. आरोपींनी त्याच जिल्ह्यात फोटोग्राफरचा मृतदेह पुरला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कॅमेऱ्यासाठी फोटोग्राफरची हत्या

तीन दिवस उलटूनही कल्याण परतला नाही. त्याचा फोन लागला नाही, तेव्हा त्याच्या पालकांनी विशाखापट्टणममधील पीएम पालेम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Photographer Killed For Camera) केली. कॉल डेटाच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी उचललं. कल्याणच्या कॅमेऱ्यासाठी मित्राच्या मदतीने त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या कॅमेऱ्याची किंमत १० लाख रुपये आहे.

त्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम पोलिसांनी तपास हाती घेतला होता. त्यांनी रविवारी या प्रकरणाचा छडा ( Crime News) लावला. आरोपींनी मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता, तेथे गेल्यानंतर मृतदेह बाहेर काढला. दिवसेंदिवस हत्येच्या घटना वाढत आहे. तरूण फोटोग्राफरच्या हत्येमुळं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी केला खुलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणममधील मधुरवाडा येथील रहिवासी कल्याण हा फोटोग्राफी, लग्न आणि इतर कार्यक्रमांमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढून उदरनिर्वाह करत होता. तो ऑनलाइन बुकिंग घेत (Andhra Pradesh Crime News) होता. कामासाठी दुर्गम ठिकाणी देखील जात होता. 26 फेब्रुवारी रोजी मुख्य आरोपी षण्मुख याने त्याला फोटोशूटसाठी रावुलापलेम येथे बोलावलं होतं.

राजमहेंद्रवरम रेल्वे स्थानकावर आल्यानंतर कल्याणला षण्मुख आणि त्याच्या मित्राने कारमधून उचललं. प्लॅनप्रमाणे त्यांनी कल्याणची हत्या केली. त्याचा मृतदेह एका निर्जनस्थळी पुरला. कल्याणचा कॅमेरा व इतर साहित्य घेऊन गेले होते. १० लाखांच्या कॅमेऱ्यासाठी फोटोग्राफरची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौरा

konkan : मनाला वेड लावणारे सौंदर्य, कोकणातील 'हा' समुद्रकिनारा पाहिलात का?

Akshay Shinde: अक्षय शिंदेची आत्महत्या नाही एन्काऊंटर, सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांचा गोळीबार; नेमकं काय घडलं? वाचा...

रस्त्यांना नदीचे स्वरूप; चारचाकी अडकली, दुचाकी गेली वाहून; पाहा VIDEO

Akshay Shinde: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची आत्महत्या, पोलिसांकडून बंदूक हिसकावून झाडल्या स्वत:वर गोळ्या

SCROLL FOR NEXT