Alibaug Revus Highway Innova car and bike accident  Saam Tv News
क्राईम

Accident News : समोरुन येणाऱ्या कारची बाईकला जोरदार धडक, काही अंतर फरफटलं; पाटील दाम्पत्याचा रस्त्यावरच करुण अंत

Alibaug Accident Husband Wife Death : अपघातानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले असून मोठा जमाव रस्त्यावर उतरला आहे. संतप्त जमावाने कारची तोडफोड केली असून अलिबाग रेवस रस्ता रोखून धरला आहे.

Prashant Patil

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग रेवस मार्गावर मानीफाटा येथे झालेल्या अपघातात दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इनोव्हा कारने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक देत ५०० मीटर पर्यंत फरफटत नेले. विश्वास पाटील आणि कल्पना पाटील अशी मृतांची नावे असून ते अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले असून मोठा जमाव रस्त्यावर उतरला आहे. संतप्त जमावाने कारची तोडफोड केली असून अलिबाग रेवस रस्ता रोखून धरला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अलिबाग पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

चिमुकलीला भरधाव कारने चिरडलं

दरम्यान, नागपूर शहरातून एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला एका भरधाव कारने चिरडलं आहे. अपघातानंतर कार थेट विजेच्या खांबावर आदळली आणि तशीच घरात घुसली. या भीषण अपघातात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी कारचालकाला तातडीने पकडलं आणि बेदम चोप दिला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. माहेरा कौसर अशफाक सय्यद असे ९ वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. ही चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक एक भरधाव वेगाने कार आली. तिने चिमुकलीला उडवले. नंतर कार विजेच्या खांबाला धडकली. या भीषण अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT