Akola Shaken: 22-Year-Old Stabbed to Death in Market Brawl Over Minor Dispute | Saam TV news Saam TV News
क्राईम

अकोला हादरलं! बाजारात कडाक्याचा वाद, पोटावर, छातीवर सपासप वार, २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Akola murder : अकोला जिल्ह्यात एकाच आठवड्यात तिसरे हत्याकांड! अकोट तालुक्यातील वस्तापूर गावात किरकोळ वादातून २२ वर्षीय मंगेश ढीगर याचा छातीवर आणि पोटावर वार करून खून, गावात खळबळ.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola crime news : अकोला जिल्हा पुन्हा हत्याकांडाने हादरून गेलाय. अकोल्यात सलग दुसऱ्या हत्या झाली आहे. एका 22 वर्षीय तरुणीची चाकू भोकसून हत्या करण्यात आली आहे. मंगेश बिहारीलाल ढीगर असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर 30 वर्षीय सेवकराम पतिराम साकोम असं मारेकरी आरोपीचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या वस्तापूर गावात रात्री उशिरा हे हत्याकांड घडलंय. मृतक आणि मारेकरी हे दोघेही वस्तापूर गावातील रहिवासी आहे.

वस्तापूर गावात काल आठवडी बाजार भरला होता, याच दरम्यान बाजारात खरेदीसाठी आलेला मृतक मंगेश आणि मारेकरी सेवकराम या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून शाब्दिक वाद झाला.. दोघांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला, अन वादाचं रूपांतर हत्येपर्यंत पोहचल. सेवकरामने सायंकाळी झालेला वादाचं कारण मनात साठवून ठेवलं, काल रात्रीच्या वेळी सेवकरामने मंगेशला एकटं बघितलं अन त्याला कायमचं सपवलं. त्याच्या पोटात आणि छातीवर गंभीर वार केल्याने मंगेश रक्ताच्या थारोळ्यात पडला.. आणि त्याचा या हल्ल्यात दुर्देवी अंत झाला. दरम्यान, या प्रकरणात श्रीकांत चैत्राम तोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू केलाय. दरम्यान, आरोपीच्या घरासमोर वस्तापूर रस्त्यावर हे हत्याकांड घडलं असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नेमकं काय घडलं होतंय..?

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या वस्तापूर गाव हत्येच्या घटनेने चांगलंचं हादरलं.. काल रात्री उशिरा अगदी शुल्लक कारणांवरून या गावात 22 वर्षे तरुणाची चाकू भोकसून हत्या करण्यात आली. पोटात आणि छातीवर चाकूने सलग वार केल्याने मंगेश ढीगर या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान, घटनेची माहिती मिळतात आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ञ पथक, श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळी पाचारण केलं होत.

दरम्यान, मारेकरी सेवकराम हा गुंड प्रवृत्तीचा आहे, गावात ग्रामस्थांवर दादागिरी करायचा. अगदी किरकोळ काढण्यातून रागाच्या भरात सेवकराने मंगेशची चाकू भोकसून हत्या केल्याचे बोलले जाते. पोलिसांनी लागलीच घटनेचे गांभीर्य पाहता आरोपीच्या शोधात पथक रवाना केलं, आणि काही तासातच मारेकऱ्याला अटक केलीय.

गेल्या 7 दिवसांत अकोल्यात तिसरं हत्याकांड...

अकोल्यात दारुच्या वादामधून काकानेच पुतण्याला ठार केलं होत. थेट पुतण्याची दगडाने ठेचून हत्या केली होती. 31 मे'रोजी ही घटना उघडकीस आली होती. कुणाल किशोर कमलाकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव होते. दुसरीकडं 2 जुन रोजी अकोल्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय कौसल यांचे लहान बंधू तथा जिल्हा परिषदचे माजी उपअभियंता संजय कौसल हत्याप्रकरण समोर आलं होत. मृत संजय कौसल आणि मारेकरी महेंद्र पवार यांच्यात दुपारी पार्किंगवरून वाद झाला होता, अन तोच वाद विकोपाला गेला आणि त्याच रात्री कौसलला कायमचं संपवलं होतंय. काल पुन्हा 2 जून रोजी जिल्ह्यातील अकोट तालुक्यात या 22 वर्षे तरुणाची हत्या झाली. अगदी किरकोळ वादातून मंगेशची हत्या झाल्याचे बोलल्या जातंय.. या तिनही घटनेत मारेकऱ्यांचा राग अनावर झाला अन त्यांनी केलेल्या कृत्यामूळ अकोलेकरांच्या मनात धडकी भरलीय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

SCROLL FOR NEXT