Crime News x
क्राईम

Shocking Crime : दारूमुळे वाद, संतापलेल्या काकाने पुतण्याचा काटा काढला, दगडाने ठेचून जीव घेतला

shocking crime in Akola अकोल्यात दारूच्या वादातून काकानेच पुतण्या कुणाल कमलाकरचा खून केल्याची घटना उघड. मृतदेह चार दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी आरोपी सुनील कमलाकरला अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Uncle Kills Nephew : दारुच्या वादामधून अकोल्यात काकानेच पुतण्याला ठार केल्याची खळबळजनक घटना घडली. थेट पुतण्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. कुणाल किशोर कमलाकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जास्तच प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता, त्यातूनच झालेल्या वादातून काकाने कुणालची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

सुनील कमालकरनं असं मारेकरी काकाचं नाव आहे.. या प्रकरणात खदान पोलिसांनी आरोपी सुनील कमलाकर याला अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कुणाल बेपत्ता असल्याची तक्रारी खदान पोलीस ठाण्यात 4 दिवसांपूर्वी दाखल होती. मात्र, त्यानंतर अकोल्यातील पेन्शनपुरा भागात काकाच्याच घरात कुणालचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तपास दरम्यान हा काकानेच पुतण्याची हत्या केल्याचं उघड झालंय.. या प्रकरणात खदान पोलिस अधिक तपास करतायत..

खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पेन्शनपुरा भागात 29 मे रोजी एका घरात कुजलेल्या अवस्थेत कुणाल किशोर कमलाकर याचा मृतदेह आढळून आला होता. घरातून दुर्गंधी सुटल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. मृत कुणाल व त्याचा काका सुनील गोपाळराव कमलाकर हे दोघेही सोबतच दारूचे प्यायचे. त्यामुळे पोलिसांनी सुनील कमलाकर याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्यानेच कुणालचा 25 मे रोजी डोक्यात दगडाने वार करून हत्या केल्याचे कबूली दिली. तो निष्प्राण झाल्यानंतरही त्याने दारू पिऊन 28 मेपर्यंत चार रात्री मृतदेहा शेजारी घालवल्या होत्या. अशी माहिती देखील खदान पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT