शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप.
घटना उघड झाल्यानंतर ग्रामस्थांकडून संताप
आरोपी शिक्षकाला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय गवळी, साम प्रतिनिधी
जगात आई-वडीलांनंतर शिक्षकाला आदर केला सर्वाधिक केला जातो. शिक्षक समाजाचे निर्माते असतात. ते भविष्यातील पिढीला घडवतात. त्यामुळे त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. पण शिक्षकच राक्षस असेल तर. अकोल्यात अशाच एका शिक्षकाचा राक्षसी चेहरा समोर आलाय. अकोल्यातील एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय. अकोला जिल्ह्यातील नवेगाव येथे ही संतापजनक घटना घडलीय. नवेगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांसह नागरिकांनी शिक्षकाला बेदम चोप दिला. ग्रामस्थांनी शिक्षकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर पांडे, असं आरोपी शिक्षकाचे नाव आहे. सुधाकर पांडेने सहा दिवसापूर्वी शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.
याप्रकरणी आरोपी शिक्षक सुधाकर पांडेविरुद्ध अकोल्या जिल्ह्यातील चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलाय.पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. शाळेत आणि परिसरात सुरक्षा उपाययोजनांची मागणी होत आहे. दरम्यान अल्पवयीन पीडितेनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकारची माहिती आईला दिली.
त्यानंतर आईनं पोलिसात शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून आरोपी शिक्षकाविरूध्द अपराध क्रमांक ३०३/२०२५ कलम ७४ भारतीय न्याय संहिता व ८, १०, १२ पोक्सो कायदयाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीस अटक करून पुढील तपास ठाणेदार रविंद्र लांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विजय घुगे, सुधाकर करवते हे करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.