Crime News Saam Digital
क्राईम

Akola Crime: सिने स्टाईल थरार! दुकानातून बाहेर पडताच अडवलं, गाडीत टाकलं, अन्.. प्रसिद्ध व्यावसायिकाचे अपहरण; अकोल्यात खळबळ

Akola Breaking News: अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीतल्या चारजिन कापाउंड परिसरात ही अपहरणाची घटना काल रात्री घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला|ता. १४ मे २०२४

अकोला शहरातील प्रसिद्ध 'काच बॉटल सप्लायर'अरुणकुमार वोरा यांचे अपहरण झाल्याने शहरभरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री अरुणकुमार वोरा हे आपले दुकान बंद करुन घराकडे जात असतानाच त्यांना अडवून त्यांचे सिने स्टाईल अपहरण करण्यात आले. शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीतल्या चारजिन कंपाऊंड परिसरात ही घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोला शहरातील दगडीपूल परिसरात अरुणकुमार यांचे 'रिकाम्या काच बॉटल'चे गोदाम आहे. काल रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करुन बाहेर पडत असतानाच एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या २ ते ३ जणांनी त्यांना अडवले. तसेच अरुणकुमार वोरा यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांचे अपहरण केले. यावेळी वोरा यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला, मात्र आसपास कोणी नसल्याने त्याचा काही फायदा झाला नाही.

अपहरणकर्त्यांनी अरुणकुमार यांना गाडीमध्ये टाकून सुसाट वेगात निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. अपहरणकर्ते हे अरुणकुमार यांची वाट पाहत दोन तासांपासून दबा धरुन बसले होते, असेही सांगण्यात येत आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, एका प्रसिद्ध व्यावसायिकाला दुकानासमोरुन सिने स्टाईल पद्धतीने अपहण केल्याने संपूर्ण अकोला शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वोरा यांच्या तपासासाठी अनेक पथके रवाना केली आहेत. तसेच परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासण्याचेही काम सुरू आहे. या प्रकरणाची सध्या संपूर्ण अकोला शहरात चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT