Crime News Saam Digital
क्राईम

Akola Crime: खिडकीतून आतमध्ये प्रवेश... अकोल्यात प्रसिद्ध उद्योजकाचे घर फोडले; २ कोटींचा मुद्देमाल लंपास

Akola Crime News: अकोल्यातल्या गौरक्षण रोडवरील एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्याला काही अज्ञात चोरट्यांनी लक्ष करून तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला|ता. ४ मे २०२४

अकोला शहर परिसरात काल मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचं समोर आले आहे. अकोल्यातल्या गौरक्षण रोडवरील एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्याला काही अज्ञात चोरट्यांनी लक्ष करून तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सोने- नाणे चांदीचे दागिने रोख रक्कम मिळून २ कोटींचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

अकोल्यातल्या गौरक्षण रोडवर उद्योगपती ब्रिजमोहन भरतीया यांचा बंगला आहे. काल मध्यरात्री भरतीया यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. भरतीया याचं कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस खिडकी तोडून आता प्रवेश केला. या चोरीत सोनं- नाणे यासह चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकत्रित 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला आहे.

या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांसह अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यासह पोलीस अधीक्षक बच्चन सिंग हे देखील घटनास्थळावर दाखल झाले आहेत. गुरुवारच्या रात्री दोन दिवसांपूर्वी अकोल्यातील आलेगाव इथे ३ घरात चोरी झाली होती. या घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होताय आता पुन्हा अकोल्यातून मोठी चोरीची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आलेगाव येथेही गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. इथं चोरट्यांनी तीन ठिकाणी डल्ला मारत ६ लाखापेक्षा जास्त किमतीच्या मुद्देमालावर हात साफ केला आहे. आलेगाव येथील शेतकरी तथा पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्या घरातील पावणे सहा लाखांच्या मुद्देमालाचाही समावेश आहे. एकाच रात्री तीन ठिकाणी झालेल्या चोरीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : शिंदेच्या शिवसेनेला मोठा हादरा! नाराज पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT