Exam Cheating Copy Case Saam Tv
क्राईम

12th Board Exam: अर्रर्र! बारावीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस बनून बहिणीला कॉपी द्यायला गेला अन् बिंग फुटलं...

Exam Cheating Copy Case: अनेक ठिकाणी बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार देखील होत आहेत, अशीच एक घटना अकोला जिल्ह्यातील पातूर येथून समोर आली आहे. एक भाऊ बहिणीच्या प्रेमापोटी चक्क पोलीस बनून परीक्षा केंद्रावर बहिणीला कॉपी द्यायला गेला होता, परंतु त्याचं बिंग फुटलं आहे.

Rohini Gudaghe

Akshay Gawali

Akola Brother Providing Copy To Sister As Fake Police

बारावीच्या परीक्षेमधील (12th Board Exam) गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे, असं असलं तरी बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्याचा एक धक्कादायक प्रकार (Exam Cheating Case) समोर आला आहे. चक्क परीक्षा केद्रांवर बहिणीला कॉपी द्यायला 'तो' तोतया (नकली) पोलीस बनल्याचा हा प्रकार आहे.(Latest Crime News)

अकोला (Akola) जिल्ह्यातील पातुर (Patur) शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल इथं बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परिक्षादरम्यान काल २१ फेब्रुवारीला चक्क पोलिसांचा गणवेश धारण करून कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचं सल्यूट करतानाच बिंग फुटलं (Exam Cheating Copy Case) आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे (वय २४, राहणार पांगरा बंदी) असं या तोतया पोलिसांचं नाव आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बहिणीसाठी बनला तोतया पोलीस

कालपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या (Brother Providing Copy To Sister) आहेत. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत. तरी, देखील पातुरच्या शाहाबाबु हायस्कुल इथं एका परीक्षार्थींचा भाऊ अनुपम खंडारे हा कॉपी पुरवण्यासाठी थेट पोलिसाचा गणवेश परिधान करून नकली पोलीस बनला.

हा बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर इकडे तिकडे फिरू लागला. तेवढ्यात पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताफ्यासह या परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी पोहचले. यावेळी त्या ठिकाणी अनुपम मदन खंडारे (Fake Police) हा देखील होता.

'असं' फुटलं बिंग

पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहतात तोतया अनुपमनं त्यांना सल्यूट ठोकला. परंतु पोलिसांनी त्याचा सल्यूट पाहून त्याच्यावर संशय आला. तसेच त्याने घातलेला गणवेश, त्यावरील नेम प्लेट चुकीची असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस (Akola Crime) आला.

पोलिसांनी त्याची चौकशी आणि झडती घेतली असता त्याच्या पॉकेटमध्ये इंग्रजी विषयाची कॉपी चिट्स सापडले (crime news) आहे. याप्रकरणी ४१७, ४१९, १७०, १७१ आणि अधिनियम १९८२ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एएसआय अरविंद पवार हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT