12th Board Exam: बारावीची परीक्षा सुरू होताच शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार, नेमकं कारण काय?

Teachers Boycott On 12th Answer Sheets: आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे. १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणी करण्यावर आणि इतर मागण्यांकरिता राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे.
Teachers Boycott
Teachers Boycott Yandex

12th Board Teachers Boycott

आजपासून बारावीच्या लेखी परीक्षा (12th Board Exam) सुरू होत आहेत. परंतु परीक्षा सुरू होत आहे तेच एक मोठी बातमी समोर येत आहे. १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणी करण्यावर आणि इतर मागण्यांकरिता राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याचं समोर येत आहे. या शिक्षकांनी बहिष्कार का टाकला आहे, ते आपण जाणून घेऊ या. (latest marathi news)

वेतन, पेन्शन, पदभरती अशा विविध मागण्यांकरिता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. शिक्षकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली (Maharashtra HSC) आहेत. तरीही शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. त्याबाबत वारंवार आंदोलने करूनही केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार

बहिष्कार टाकल्यामुळे आता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार नाहीत. गेल्या वर्षी ही महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार टाकला ( Teachers Boycott On 12th Answer Sheets) होता. त्यावळी काही प्रमाणात मागण्या मान्य झाल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय मागे घेतला गेला होता. मात्र, अजूनही काही मागण्या पूर्ण न झाल्याने आता पुन्हा एकदा शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे.

वेतन आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचं १२वी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आंदोलन सुरू आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात (Junior College Teachers Boycott) नाहीत. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने उत्तरपत्रिका तपासणी बहिष्कार आंदोलन करण्यात येणार असल्याची सूचना दिली होती.

Teachers Boycott
HSC Board Exam : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; कॉफी बहाद्दरांना पकडण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथके

शिक्षकांच्या मागण्या काय आहेत

आता आजपासून बारावीची परिक्षा सुरु होत आहे. परंतु बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका शिक्षक तपासणार नाहीत. अनुदानातील जाचक अटी रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरणे, अशा विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक आंदोलन (Teachers Boycott) करत आहे.

परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी २७१ भरारी पथकांची (Bharari Pathak) नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार करत आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देत आहे.

Teachers Boycott
12th Board Exams: बारावीची परीक्षा उद्यापासून; एक दिवस आधी शिक्षण मंडळाने दिली महत्वाची माहिती, पाहा वेळापत्रक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com