Haryana crime news SAAM TV
क्राईम

Crime news: मस्करी ठरली जीवघेणी! मित्राच्या गुप्तांगात भरली कंप्रेसरने हवा; पोट फुटून बाहेर आली आतडी, तरूणाचा मृत्यू

Haryana crime news: गुरुग्राममध्ये वर्कशॉपमध्ये झालेल्या धक्कादायक घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. मस्करीतून सुरू झालेल्या वादाने गंभीर रूप घेतलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हरियाणामध्ये अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील रामपुरा भागात एका मस्करीत सुरू झालेल्या वादाने गंभीर स्वरूप घेतलं. यावेळी एका तरूणाने त्याच्याच मित्राच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एअर कंप्रेसरच्या नोजलने हवा सोडली. हे प्रकरणं इतकं गंभीर निघालं मित्राला त्याचा जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामपुराच्या एका वर्कशॉपमध्ये काही तरुणांमची बोलता बोलता मस्करी सुरू होती. याच दरम्यान किरकोळ वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की आरोपी नरेशने संतापाच्या भरात अत्यंत धोकादायक पाऊल उचललं. वर्कशॉपमध्ये असलेल्या इंडस्ट्रियल एअर कंप्रेसरचा नोजल त्याने त्याचा मित्र हरविंदरच्या प्रायव्हेट पार्टजवळ लावून अचानक हवा सोडली.

यावेळी एअर कंप्रेसरचं प्रेशर इतकं जास्त होतं की काही क्षणांतच हरविंदरचं पोट फुग्यासारखं फुगलं. यावेळी शरीरातील अंतर्गत दाब वाढत गेला. या धक्कादायक प्रकारामुळे हरविंदरच्या पोटातील अवयवांवर जबरदस्त ताण आला आणि त्याच्या आतड्यांचंही मोठं नुकसान झालं.

तातडीने केलं खाजगी रूग्णालयात दाखल

यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांनी सांगितलं की, हवा इतक्या वेगाने शरीरात गेली की हरविंदरची आतडी बाहेर येण्याइतकी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी बराच वेळ त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याची प्रकृती सतत खालावत गेली आणि अखेर मंगळवारी उशिरा संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.

पोस्टमार्टम करणारे डॉक्टर दीपक माथुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरात गेलेल्या हवेचा दाब एखाद्या स्फोटासारखा झाला होता, ज्यामुळे अंतर्गत अवयव पूर्णपणे निकामी झाले.

कुटुंबाचा एकमेव आधार होता हरविंदर

मृत हरविंदर मागील आठ वर्षांपासून गुरुग्राममध्ये वेल्डर म्हणून काम करत होता. त्याच्या कुटुंबात चार मुली आणि एक लहान मुलगा आहे. हे सर्वजण गावात आजोबांसोबत राहतात. हरविंदर हा कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

खेडकी दौला पोलीस ठाण्याने या प्रकरणात तत्काळ कारवाई करत मृताच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी नरेश कुमारविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी नरेश हा व्यवसायाने जेसीबी चालक आहे.

पोलीस प्रवक्ता संदीप कुमार यांनी सांगितलं की, हा प्रकार केवळ क्षणिक रागातून झाला की यामागे काही जुनी वैर भावना होती, याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati-Rahuri Exit Poll: बारामती अन् राहुरीचा एक्झिट पोल आला समोर, कोण निवडून येणार?

अमरावतीनंतर अकोल्यात 'लव्ह जिहाद', हरियाणातील तरुणीला डांबून अत्याचार

End Of Life Symptoms: भूक कमी अन्..., मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यात होतात हे 5 त्रास; वेळीच घ्या जाणून

Maharashtra News Live Update: वादग्रस्त किशोर महाराज शिवनीकर नवा व्हिडिओ आला समोर

Vidhan Parishad Election : सूनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा विधानपरिषद उमेदवार ठरला? युवा नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT