AI Cyber Crime Saam Digital
क्राईम

AI Cyber Crime: सावधान! एआयचा गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश, आवाजाची नक्कल करून केली खंडणी वसूल

AI Cyber Crime: देशभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना आता यात एआयची भर पडली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने फसवणुकीला सुरुवात झाली आहे. एआयच्या मदतीने खंडणी वसुली करण्यासारखे गुन्हे समोर येत आहेत.

Sandeep Gawade

AI Cyber Crime

देशभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना आता यात एआयची भर पडली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने फसवणुकीला सुरुवात झाली आहे. एआयच्या मदतीने खंडणी वसुली करण्यासारखे गुन्हे समोर येत आहेत. दिल्लीतील यमुनानगरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एआय टूलच्या मदतीने एका व्यक्तीचा आवाज क्लोन करून वृद्ध व्यक्तीकडून खंडणी वसूल करण्यात आली असून याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील यमुना विहार येथील रहिवाशी लक्ष्मीचंद चावल यांच्या मोबाईलवर २४ ऑक्टोबर रोजी एक व्हॉट्सअॅप कॉल आला. जर ५० हजार रुपये दिले नाहीत तुर तुमच्या पुततण्याला संपवून टाकू अशी धमकी देण्यात आली. व्हॉट्सअॅप कॉलिंगदरम्यान एका व्यक्तीचा रडण्याचा आवाज लक्ष्मीचंद यांना ऐकू आला. हा आवाज त्यांच्या पुतण्याचा होता. आवाज ऐकून लक्ष्मीचंद घाबरले. त्यांना वाटले की आपल्या पुतण्याचं अपहरण झालं आहे. त्यामुळे घाबरलेल्या लक्ष्मीचंद यांनी व्हॉट्सअॅपवर आलेल्या पेटीएम नंबरवर ५० हजार रुपये ट्रान्सफर केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पैसे ट्रान्सफर केल्यानंतर लक्ष्मीचंद यांनी भावाला फोन करून पुतण्याची चौकशी केली. मात्र त्यांचा पुतण्या घरी सुरक्षित होता, तो कुठेही गेला नसल्याचं समोर आलं. त्यामुळे लक्ष्मीचंद यांना आपली पसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. इशान्या दिल्लीतील पोलीस स्थानकात सायबर क्राइम अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र आजपर्यंत या प्रकरणाचा कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. यावरून एआयचा गुन्हेगारी क्षेत्रात झालेला प्रवेश किती भंयकर असू शकतो याची कल्पना येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : इंधन दरवाढीचा नाशिक विमानसेवेला फटका

Water Crisis : पुणेकरांवर पाणीसंकट! 'या' भागात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार; वाचा संपूर्ण माहिती

Diabetes-Weight Loss : मधुमेहाच्या रुग्णांचेही झटपट वजन होईल कमी, फक्त फॉलो करा 'या' ५ सीक्रेट टिप्स

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर काही क्षणांतच विमान कोसळलं; दुर्घटनेत १२ जणांचा जागीच मृत्यू

Raigad : कमळाच्या पाकळ्यांसारखी रचना असलेला अभेद्य जलदुर्ग, रायगडला गेल्यावर 'हा' किल्ला नक्की पाहा

SCROLL FOR NEXT