Ahmadnagar Rahata News Saam TV
क्राईम

Ahmednagar Crime: मित्रानेच मित्राला संपवले, मृतदेह ऊसाच्या शेतात फेकला; भयंकर हत्येचा महिन्यानंतर उलगडा

Crime news in Marathi: महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या गौरव शिरसाठ याची मित्रानेच मारहाण करून हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून आरोपीला पोलीसांनी जेरबंद केले आहे. या घटनेने संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरुन गेला आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर| ता. ३० डिसेंबर २०२३

Ahmednagar Crime News:

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे तरूणाची मित्रानेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या गौरव शिरसाठ याची मित्रानेच मारहाण करून हत्या केल्याचं स्पष्ट झालं असून आरोपीला पोलीसांनी जेरबंद केले आहे. या घटनेने संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरुन गेला आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगरच्या (Ahmednagar) राहाता शहरातील गौरव पंडित शिरसाठ हा ३० वर्षीय तरुण महिनाभरापूर्वीपासून बेपत्ता होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आई वडिलांनी राहता पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता.

हा तपास सुरू असतानाच गौरव शिरसाठचा मित्र किरण मोरेही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी किरण मोरेचा शोध घेण्यास सुरूवात केली. किरण मोरेला ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी केली असता त्यानेच गौरव शिरसाठची हत्या केल्याचे कबुल केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किरण मोरेने गौरव शिरसाठ याची लाकडी दांडक्याने मारुन निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह उसाच्या शेतात टाकल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी किरण बबन मोरे या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे.. मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले असून ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskar Jadhav & Ramdas Kadam: त्यांचा नेताच बाया नाचवून पैसे जमा करणारा असेल तर... भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर हल्लाबोल|VIDEO

Why Women Weight Gain After Marriage: लग्नानंतर महिलांचे वजन का वाढते? यामागील कारण काय?

Mumbai Fire : मुंबईत दोन ठिकाणी आगीच्या घटना; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

EPFO UAN Merge: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीएफ अकाउंटचे यूएएन आहेत? मग मर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Kidney damage: डोळ्यांमध्ये दिसणारे हे ५ बदल वेळीच ओळखा; किडनी खराब होण्याची असतात लक्षणं

SCROLL FOR NEXT