PM Modi Ayodhya : कोण आहे ती गरीब महिला? पीएम मोदींनी का घेतला तिच्या घरी चहा? जाणून घ्या

PM Modi in Ayodhya: अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केल्यानंतर आणि दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी निषाद कुटुंबियांना भेटण्यासाठी पोहोचले. तेथे त्यांनी चहा घेतला आणि निषाद कुटुंबातील लोकांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या घरी सुमारे १० ते १५ मिनिटे थांबले.
PM Modi in Ayodhya
PM Modi in AyodhyaANI
Published On

PM Modi Ayodhya Who Meera Manjhi:

पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्यांदा रामनगरी अयोध्येला भेट दिली. मोदींचा हा दौरा ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वे स्टेशनच्या नव्या भवनाचं लोकार्पण केल्यानंतर अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्धाघाटन केलं. यासर्वात जास्त चर्चा होत आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका गरीब महिलेच्या घरी चहा घेतला. आपला आपला प्रोटोकॉल तोडत पंतप्रधान मोदींनी या महिलेच्या कुटुंबियासोबत १० ते १५ मिनिटे घालवली. मोदींच्या कृतीने अनेकांची जिंकली आहेत. (Latest News)

या महिलेचं नाव मीरा मांझी असून पंतप्रधान मोदींनी मीराच्या घरच्यांशी पंधरा मिनिटे संवाद आणि त्यांच्यासोबत चहा घेतला. मीरा मांझी कोण आहे याची चर्चा सर्वत्र होत आहे. रोड शो केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं. यासह त्यांनी अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका गरीब दलित महिलेच्या घरी चहा घेतला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या महिलेचं नाव मीरा मांझी असून या महिलेच्या घरी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जेवण केलं होतं. आत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या घरी चहा घेतला. भगवान श्रीराम जेव्हा वनवासात होते, त्यावेळी या दलित कुटुंबियाच्या पूर्वजांनी नदीच्या पलीकडे श्रीराम यांना मदत केली होती, असा दावा आहे, या कुटुंबियांचा आहे. तसेच हे कुटुंब उज्ज्वला योजना आणि पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थी आहेत. श्रमिक बहन योजनेचा लाभ १० कोटी महिलांनी घेतलाय. यातील सर्वात शेवटीची महिला मीरा मांझी असल्याचं सांगितलं जात आहे.

पंतप्रधान मोदींनी मीरा मांझी यांना सरकारी योजनांची माहिती विचारली. कोण-कोणत्या योजनांचा लाभ त्यांना मिळाला याची विचारणा मोदींनी केली. घर आणि गॅस सिलेंडर मिळाले का? फ्रीमध्ये पाणी मिळत आहे का? योजनांचा लाभ मिळाल्यानंतर काय वाटतं, असे प्रश्न मोदींनी केले. मोदींच्या प्रश्नाला उत्तर देताना मीरा मांझी म्हणाल्या, मला चांगलं वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी येतील आणि चहा घेतील असं कधी वाटलं नव्हतं. पंतप्रधान मोदी घरी येणार असल्याची माहिती मला एका तासाआधी मिळाली होती. हे क्षण मला आयुष्यभर लक्षात राहतील असं त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

PM Modi in Ayodhya
PM Narendra Modi Interview: भाजप पक्षाचं अस्तित्व फक्त हिंदी पट्ट्यात आहे का? PM नरेंद्र मोदींनी मोजक्या शब्दात दिलं उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com