Palghar Bus Accident: हृदयद्रावक! भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी

Palghar Breaking News: पालघरच्या मनोर विक्रमगड रोडवर बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत.
Palghar Bus Accident
Palghar Bus AccidentSaamtv
Published On

Palghar Bus Accident:

पालघरमधून (Palghar) एक भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. पालघरच्या मनोर- विक्रमगड रोडवर बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघरच्या (Palghar) मनोर विक्रमगड रोडवर शनिवारी (३० डिसेंबर) बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. मनोर विक्रमगड रोडवर बोरांडा येथे भरधाव डंपरने बसला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसमधील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर १५- २० प्रवासी गंभीर जखमी झाले.

यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावितही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ जखमींना मदत करत उपचारासाठी रुग्णालयात हालवले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी काही जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एसटी बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Palghar Bus Accident
Political News: शिंदे गट अन् भाजपमध्ये लोकसभा मतदारसंघात अदलाबदल होणार? भाजप खासदार काय म्हणाले?

ताम्हिणी घाटात बसचा अपघात..

दरम्यान, आज (शनिवार, ३० डिसेंबर) सकाळी रायगडमध्ये पुण्याहून कोकणकडे सहलीला निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला. ५७ प्रवाशांना घेऊन सहलीला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५५ जण जखमी जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Palghar Bus Accident
Amravati News : अबब! किंमत ५१ लाख, ११०० किलो वजन; 'सुलतान'चा स्वॅग भारी, दररोजचा आहार भन्नाट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com