Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, संतापलेल्या बापाने तरुणाला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; दीड वर्षांनंतर...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने तरुणाची हत्या केली. दीड वर्षांनंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. मुलीची इज्जत वाचवण्यासाठी या व्यक्तीने हे धक्कादायक कृत्य केले. या घटनेमुळे आग्र्यामध्ये खळबळ उडाली.

Priya More

उत्तर प्रदेशच्या आगरामधून भयंकर घटना समोर आली आहे. एका वडिलांनी आपल्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी एकाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. अगदी 'दृश्यम' चित्रपटाला साजेसं हे हत्याकांड आहे. या घटनेमुळे आगरामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगऱ्याच्या मलपुरा भागामध्ये ही घटना घडली. याठिकाणी राहणारा १७ वर्षीय तर तरुण लग्न समारोहामध्ये व्हिडीओ बनवण्याचे काम करायचा. याचदरम्यान त्याची नजर एका १६ वर्षीय मुलीवर पडली. संधी साधत या तरुणाने या मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला. या व्हिडीओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेलिंग करून लागला. तो या मुलीकडे ५० हजार रुपये मागत होता.

पीडित मुलगी घाबरली आणि तिने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितले. सुरूवातीला या मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरुण ऐकायला तयार नव्हता. तो सतत मुलीला त्रास देत होता. १८ फेब्रुवारी २०२४ ला हा तरुण एका लग्नाला गेला होता आणि तिथून तो बेपत्ता झाला. त्यानंतर त्यापरिसरातच एका व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पण ओळख पटू नाही शकली त्यामुळे हे प्रकरण तिथेच थांबले. पण खरं तर हा मृतदेह त्याच तरुणाचा होता जो मुलीला त्रास देत होता.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना नंतर कळले की मुलीच्या वडिलांनी फेसबुक चॅटद्वारे तरुणाला आपल्या दुकानात बोलावले होते. त्याठिकाणी आधी मफलर आणि नंतर वायरने गळा आवळून तरुणाची हत्या केली. नंतर आरोपीने तरुणाचा मृतदेह ड्रममध्ये भरला आणि शेतात नेला. त्यानंतर शेतामध्येच मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना कोणताही पुरावा मिळू नये यासाठी आरोपीने हे कृत्य केले.

सुरुवातीला, पोलिसही गोंधळले. मुलीच्या वडिलांचा सहभाग असल्याचा कोणालाही संशय आला नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार बेपत्ता तरुणासाठी एफआयआर दाखल करण्यात आली तेव्हा पोलिसांनी नवीन तपास सुरू केला. कॉल डिटेल्स तपासले . १८ फेब्रुवारी रोजी मृत आणि आरोपीचे लोकेशन खारी नदीजवळ आढळले. त्यानंतर मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली. अहवालात अर्धवट जळालेला मृतदेह तरुणाचा असल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, त्याने आपल्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी हत्येची योजना आखली होती. विशेष म्हणजे हत्येनंतर तो हे रहस्य कायमचे लपवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जाण्याची तयारीही करत होता. पण तसे झाले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT