UP Crime Saam tv
क्राईम

UP Crime: नवऱ्याचा मृतदेह लपवण्यासाठी महिलेचं अजब शक्कल; मोलकरणीला बनवायला लावल्या १६ चपत्या अन् कढी भात

Bank Manager UP Crime : आग्रा येथील रामरघु एक्झोटिका कॉलनीत बँक मॅनेजरच्या हत्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

UP Crime:

आग्रा येथे एक धक्कादायक प्रकार घडलाय. येथे एका बँक मॅनेजरची त्याची पत्नीचे हत्या केल्याची घटना समोर आलीय. हा हत्याकांड होऊन तब्बल १२ दिवस झाले असून पोलिसांना अद्याप संशयीत आरोपी पत्नी सापडलीय नाहिये. सचिन उपाध्य असं मृत बँक मॅनेजरचं नाव आहे. तर प्रियांका उर्फ मोना असं या बँक मॅनेजरच्या पत्नीचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणात नवीन बाब समोर आलीय. (Latest News)

आग्रा येथील रामरघु एक्झोटिका कॉलनीत ही घटना घडलीय. बँक मॅनेजरच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करुनही ४ दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी पत्नी पसार झाल्याचा आरोप सचिनच्या उपाध्य यांच्या कुटुंबियांनी केलाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सचिन उपाध्य यांची हत्या १२ ऑक्टोबर रोजीच झाली होती. सचिन यांनी आत्महत्या केल्याची माहिती आधी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी सचिनच्या शरीरावर जखमा आणि भाजलेल्या खाणाखुणाही दिसल्या. सचिनच्या मानेवरही काही जखमा झाल्या होत्या असंही पोलिसांनी नमूद केले होते. परंतु सचिनच मृतदेह सापडल्यानंतरही पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच या हत्येचं प्रकरण उघड झालं नव्हतं.

मृतदेह मिळून ७ दिवस झाले होते तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता नव्हता. तर सचिन यांची पत्नी प्रियांका उर्फ मोनाने सचिन आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात हुंड्यासाठी आपला छळ केला जात असल्याची तक्रार महिला पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र त्यानंतर सचिन यांचा मृतदेह सापडूनही त्यानंतर पोलिसांनी प्रियांकाला अटक केली नाही.

हत्येच्या १२ दिवसानंतर एक गोष्ट उघड झालीय. सचिन यांच्या पत्नीने हत्या करुन त्यांचा मृतदेह खोलीत लपवून ठेवला होता. त्यादिवशी मोलकरणीला कढीभात आणि १६ चपत्या बनवण्यास सांगितल्या होत्या. जेणेकरून मोलकरणीला या प्ररणाचा सुगावा लागू नये.

पतीची हत्या आपण केल्याचा संशय कोणी घेऊ नये यासाठी तिने अनेक नाटकं केल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी तिने शेजारील कुटुंबीयांचा फोन घेऊन तिने आपल्या वडिलांना दोन वेळा फोन लावून बोलली होती. प्रियांकाचे वडील बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आहेत. दरम्यान, सचिन उपाध्याय यांची हत्या झाल्यानंतर पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर सांगण्यात आले की, सचिन यांची हत्या ११ ऑक्टोबर रोजीच करण्यात आली होती.

म्हणजेच त्यांचा मृतदेह हा तब्बल १७ तास लपवून ठेवण्यात आल्याचे अहवालानंतर स्पष्ट झालं. तसेच सचिन उपाध्याय यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. मात्र त्याच्या गळ्यावर भाजल्याच्याही जखमा असून ही हत्या करण्यामागे नेमका हेतू काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान सचिनच्या कुटुंबीयांनीही आरोप केलाय की, त्या परिसरात सीसीटीव्ही नसते तर सचिन यांचा मृतदेह बेपत्ता करण्यात आला असता. सीसीटीव्ही लावल्याची माहिती प्रियांकाला माहिती असल्यामुळेच तिने हे धाडस केले नाही, असा आरोपही सचिनच्या कुटुंबीयांनी केलाय.

दरम्यान सचिनच्या हत्येनंतर ज्या खोलीत मृतदेह लपवला होता, त्या खोलीला प्रियांकाने कुलूपही लावले होते. तर ही हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रियांकाचा भाऊ गेला होता असंही त्यांनी आरोप केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस उद्या पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

Gondia Medical Collage : गोंदिया शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटने आग; रुग्णालयात नागरिकांची पळापळ

Maharashtra Flood: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत पैसे जमा होणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

IMD Warns : आभाळ फाटल्यासारखा पाऊस, जिकडे-तिकडे पाणीच पाणी, कंरट लागल्यामुळे ७ जणांचा मृत्यू

Crime News : घटस्थापनेच्या दिवशी अघटित घडलं! देवीच्या उत्साहात तल्लीन असलेल्या पाच तरुणांवर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT