ACB officials arrested a woman talathi in Satana, Nashik, while allegedly accepting a ₹10,000 bribe for land record corrections and Satbara entry updates. saam tv
क्राईम

Nashik Bribe Case: सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी पैशांची मागणी; १० हजारांची लाच घेताना महिला तलाठीला रंगेहात पकडलं

Anti-Corruption Bureau Nabbed Talathi : सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे आणि वारस नोंदीतील नाव दुरुस्त करण्यासाठी तलाठीनं शेतकऱ्याकडे लाच मागितली होती.

Bharat Jadhav

  • सटाणा तालुक्यातील महिला तलाठीला १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलं.

  • सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे आणि वारस नोंदीसाठी मागितील लाच

  • या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

राज्यात बोगस तलाठी भरतीचा पर्दाफाश झाल्याने खळबळ उडाली असताना नाशिकमध्ये सटाणा येथे एका भ्रष्टाचार तलाठी अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं आहे. सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे आणि वारस नोंदीत कागदपत्रानुसार नावात दुरुस्ती करण्यासाठी लाच मागणाऱ्या ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

​मनिषा नारायण बावीस्कर (३६, रा. साठफुटी रोड, पाठक मैदान, सटाणा) असे या संशयित ग्राम महसूल अधिकारीचे (तलाठी) नाव आहे. सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे त्या कार्यरत आहेत. मौजे ब्राह्मणगाव येथील एका शेतकऱ्यानं त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. तक्रारदाराची शेत गट क्रमांक ८२४ मध्ये जमीन आहे, त्यावर भाऊसाहेब हिरे विविध कार्यकारी सेवा संस्था सोसायटीचे ४ लाख रुपयांचा चढविलेला बोजा कर्ज माफ करण्यात आले होता.

परंतु हा बोजा सातबारा उताऱ्यावरून कमी झालेला नव्हता. यासह शेत गट क्रमांक ८२४ वर वारस नोंदीच्या वेळी त्यांचे नाव वेगळे नमूद केले होते. त्यांचे नाव कागदपत्रावरील नावाप्रमाणे बदलण्यात यावे यासाठी तक्रारदाराने अर्ज दिला होता.

महिला तलाठी अशी अडकली जाळ्यात

या दोन्ही कामांसाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) मनिषा बावीस्कर यांनी स्वतःसह मंडळ अधिकारी यांच्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यानं लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक कार्यालयात तक्रार केली होती. त्यानंतर २७ एप्रिल २०२६ रोजी तक्रारदार आणि पंच यांनी मनिषा बावीस्कर यांची सटाणा येथील मराठा हायस्कूल येथे जनगणना प्रशिक्षणादरम्यान तसेच प्रशिक्षणानंतर सटाणा तहसीलदार कार्यालयात भेट घेतली.

तेव्हा संशयित मनिषा बावीस्कर यांनी उपरोक्त कामांसाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. २८ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) मनिषा बावीस्कर तसेच मंडळ अधिकारी यांची पडताळणी करण्यासाठी पंचांना पाठविले असता मूळ तक्रारदाराने आपल्या कामाबाबत विचारणा केली.

परंतु, मंडळ अधिकारी यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली नाही. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसीलदार कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी सटाणा तहसीलदार कार्यालयात पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने तलाठी अधिकारी मनिषा बावीस्कर यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune : धुकं, डोंगर अन् ३५० फूट उंच धबधबा! लोणावळ्याच्या कुशीत लपलेले 'हे' ठिकाण दिसते स्वर्गाहून सुंदर

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

Monsoon Hair Fall: पावसाळ्यात केस गळतायत? हे तेल ठरेल रामबाण उपाय

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT