abhilasha mittal from washim ends life in pune Saam Digital
क्राईम

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थींनीने संपवलं जीवन, नातेवाईकांसह मैत्रिणींची पाेलिस चाैकशी सुरु

दरम्यान पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अभिलाषा हिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune :

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिलाषा मित्तल (वय 27, मूळ राहणार वाशिम) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यींनी युवतीचे नाव आहे. अधिक तपास खडक पाेलिस करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राथमिक माहितीनुसार वाशिम येथील अभिलाषा मित्तल ही गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वास्तव्यास होती. पुण्यातील गुरुवार पेठेत एका हॉस्टेलमध्ये काही मैत्रिणींसोबत ती राहत होती.

अभिलाषाने तिच्या खोलीचा दरवाजा बंद करून आत्महत्या केली. मैत्रिणींनी दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला असता आत मधून कुठलाच आवाज येत नसल्याने मैत्रिणींनी रूमची खिडकी उघडली. त्यांना अभिलाषाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अभिलाषा हिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या यादृष्टीने तपास सुरु असून तिच्या नातेवाईकांची आणि इतर मैत्रिणींची चौकशी सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

नीट पेपरफुटीनंतर निकालात घोळ, विद्यार्थी, पालकांचा संताप, NTAवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT