74 caught at club near latur while gambling 2 crore 28 lakh material seized Saam Digital
क्राईम

लातूर पाेलिसांचा क्लबवर छापा, जुगार खेळणा-या 74 जणांवर गुन्हा दाखल, 2 कोटी 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

Latur Crime News : यामध्ये नियम तोडून जुगार खेळणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेश या चार राज्यातील 74 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Siddharth Latkar

- संदीप भाेसले

लातूर जिल्ह्यात तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून माेठी कारवाई केली. या कारवाईत चार राज्यातील 74 जणांवर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. पाेलिसांनी एकूण 2 कोटी 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने बेकायदेशिर रित्या जुगार अड्डा चालविणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

लातूर जिल्ह्यातल्या तांबाळा शिवारात परवानाधारक क्लबवर सहाय्यक पोलिस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी मोठा फौज फाटा घेऊन रात्री 1 वाजता कारवाई केली. यामध्ये नियम तोडून जुगार खेळणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेश या चार राज्यातील 74 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सहाय्यक पोलिस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी कारवाई बाबत माहिती दिली. ते म्हणाले या कारवाईत 2 कोटी 28 लाख रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लातूरच्या औराद-शहाजानी पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रसह अन्य राज्यातील असे एकूण 74 जणांवर गुन्हा नाेंदविला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT