पिंपरी चिंचवड : मतदान केंद्रावर गाेंधळ, उध्दव ठाकरे गटाच्या शहराध्यक्षाला अटक

Lok Sabha Election 2024 : दरम्यान पाेलिसांकडून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा पिंपरी चिंचवड शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी केला आहे.
lok sabha election 2024 police charged uddhav thackeray faction pimpri chinchwad president
lok sabha election 2024 police charged uddhav thackeray faction pimpri chinchwad presidentSaam Digital

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पिंपरी चिंचवडचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलिस ठाण्यात हा गुन्हा नाेंदविण्यात आला असून भाेसले यास अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सचिन सुरेश भोसले हे नागु बारणे प्रशालेचा मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी आले असता बाहेरून त्यांनी मोबाईल मागवून घेऊन मतदानाचे मशीन उलट्या क्रमाने लावलेले आहे याबाबतचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले.

lok sabha election 2024 police charged uddhav thackeray faction pimpri chinchwad president
CBSE 12th Results 2024: बारावीचा निकाल जाहीर, सीबीएसईत मुलींची बाजी; असा पाहा निकाल

तसेच त्यांनी मतदान प्रक्रिया राबविणारे अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन करून त्यांना शासकीय कर्तव्य निभावण्यामध्ये अडथळा आणला. या प्रकरणी सचिन भोसले यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा सचिन भोसले यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

lok sabha election 2024 police charged uddhav thackeray faction pimpri chinchwad president
Chandrashekhar Bawankule: महाविकास आघाडीचा फुगा फुटणार : चंद्रशेखर बावनकुळे, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com