सध्या सोशल मीडियाचं (social media) क्रेझ फार वाढत चाललं आहे. अनेकजण आभासी मित्रांना प्राधान्य देताना दिसतात. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर रोज नवीन नवीन मित्र मिळतात. अनेकदा यातुन गैरप्रकारही समोर येतात. खरं तर यातुन गुन्हे घडल्याचं देखिल स्पष्ट झालंय. मुंबईतुन देखील असाच एक प्रकार समोर आलंय. (latest marathi crime news)
एका तरूणीवर तिच्या कथित २४ वर्षीय सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्रानेच (Social Media Friend) बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील वाळकेश्वर भागात घडली आहे. आरोपीवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आरोपीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख
१६ जानेवारी ही घटना उघडकीस आलीय. मालाड पोलीस ठाण्यात पीडितेने आरोपीविषयी तक्रार केलीय. ही तरूणी २१ वर्षांची (Sexually Abused) आहे. आरोपीनं दारूच्या नशेमध्ये बलात्कार केलं असं पीडित तरूणीने तक्रारीत म्हटलंय. आरोपी हा तिचा सोशल मीडिया फ्रेण्ड आहे. तिची आरोपीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यांची २ महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. ते दोन महिन्यांपासून संपर्कात होते.
१३ जानेवारीला या दोघांनी भेटायचं ठरवलं होतं. त्यामुळे ते मुंबईतील एका पबमध्ये ड्रिंक्ससाठी भेटले. मध्यरात्री पुन्हा एका पबमध्ये गेले. त्यानंतर जेवण्यासाठी ते हॉटेलमध्ये गेले. ड्रिंक्समुळे तरुणी ही दारूच्या नशेत होती. बेशुध्द अवस्थेत तिला आरोपी ((Social Media Friend) वरळीतली सर पोचखानवाला रोड येथील त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला. सकाळी तरूणीला जाग आली, तेव्हा तिला शरिरावर जखमा असल्याचं लक्षात आलं. तेव्हा तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचं समजलं.
आरोपी बेपत्ता
यानंतर तिने या घटनेची (Mumbai crime) माहिती पालकांना दिली. त्यानंतर दोन दिवसांनी मालाड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मालाड पोलिस ठाण्यातील हे प्रकरण वरळी पोलिसांकडे वर्ग करण्यात आलंय.
आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरूद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. परंतु आरोपी (Social Media Friend) बेपत्ता असल्याची माहिती समोर आलीय. आरोपीचा शोध सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.