Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: मामाच्या घरून परतताना दिव्यांग तरुणीवर सामूहिक बलात्कार, बचावासाठी पळत राहिली पण...; घटनेपूर्वीचा CCTV व्हिडीओ समोर

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये २१ वर्षीय दिव्यांग तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पीडित तरुणी बचावासाठी पळाताना दिसत आहे.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये २१ वर्षांच्या दिव्यांग तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये ही घटना घडली. ही घटना घडली ते ठिकाण पोलिस ठाण्यापासून फक्त २० मीटर अंतरावर आहे. पीडित तरुणीवर शेतात सामूहिक बलात्कार करून आरोपी फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यापूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पीडित तरुणी आपल्या बचावासाठी रस्त्यावरून पळताना दिसत आहे. या तरुणीच्या मागे ५ ते ६ दुचाकीवरून तरुण येताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे ही घटना पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाच्या जवळ घडली. ही तरुणी पळत असताना आणि आरोपी तिचा पाठलाग करत असल्याचे पोलिस अधिक्षकांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले.

पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या तरुणीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. पीडित तरुणीला बोलता आणि ऐकायला येत नाही. सोमवारी सकाळी ती आपल्या मामाच्या घरी गेली होती. मामाचे घर तिच्या घरापासून फक्त १ किमी अंतर दूर आहे. संध्याकाळी ७ वाजता ही मुलगी मामाच्या घरातून आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. पण रात्र झाली तरी घरी आली नाही त्यामुळे तिचे कुटुंबीय चिंतेत आले.

पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तरुणीचा शोध घेतला असता ती एका शेतामध्ये रडत असल्याचे आढळून आले. तिचे कपडे फाटलेले होते. पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme: महाराष्ट्र सरकारची खास योजना! या नागरिकांना मिळतात ₹३०००; अटी काय? वाचा सविस्तर

Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

Bigg Boss Marathi 6 : "लांब व्हा..."; बिग बॉसचा पारा चढला; 'तिकीट टू फिनाले'साठी २ सदस्यांनी घरात घातला राडा | VIDEO

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

New Labour Law: १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा; पगार होणार कमी; PF, ग्रॅच्युटीमध्येही बदल

SCROLL FOR NEXT