UP Crime News Saam Digital
क्राईम

UP Crime News: शिक्षिका, प्रेमप्रकरण अन् ३० लाखांची खंडणी ...१० वीच्या विद्यार्थ्याच्या खूनाची धक्कादायक घटना

UP Crime News: दहावीत शिकणारा एक विद्यार्थी ट्यूशनसाठी सोमवारी रात्री आपल्या स्कूटीवरून घरातून निघाला मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परत आलाच नाही. घरी सर्व चिंतेत असतानाच एक अज्ञात व्यक्ती ३० लाखाच्या खंडणीचा कागद घरी घेकून फरार झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

UP Crime News

दहावीत शिकणारा एक विद्यार्थी ट्यूशनसाठी सोमवारी रात्री आपल्या स्कूटीवरून घरातून निघाला मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परत आलाच नाही. घरी सर्व चिंतेत असतानाच एक अज्ञात व्यक्ती ३० लाखाच्या खंडणीचा कागद घरी घेकून फरार झाली. घाबरलेल्या त्या कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. अपहरणाच्या शक्यतेने पोलीस प्रशासन सतर्क झाले. खुद्द जॉइंट कमिश्नर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासणी केली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कुशाग्रचा मृतदेह आढळून आला आणि सर्व आशा मावळल्या. मात्र या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दहावीत शिकण घेत असलेला कुशाग्र हा कानपूरमधील एका व्यापाऱ्याचा मुलगा. कुशाग्रचा मृतदेह त्याची ट्यूशन टीचर रचिताच्या घरातील स्टोअर रूममध्ये सापडला आहे. कुशाग्रची गळा आवळून हत्या करणारा दुसरा कोणी नसून रचिताचा बॉयफ्रेंड प्रभात आहे. कुशाग्र आणि रचिताचे अफेअर सुरू असल्याचा प्रभातला संशय होता. यातूनच त्याने कट रचून कुशाग्रचा खून केला. या कारस्थानात रचिता आणि प्रभासचा मित्र आर्यनचा सुद्धा हात आहे.

दरम्यान कुशाग्रच्या हत्येनंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी या तिघांनी खंडणीसाठी खून करण्यात आल्याचा बनाव रचला. प्रभातला त्याचं नावं या प्रकरणात पुढे यावं असं वाटतं नव्हतं. पोलीस अपहरणाच्या अँगलने तपास करत राहिले. दरम्यान यासाठी प्रभासने त्याचा मित्र आर्यनची मदत घेतली होती.

रचिताच्या घरी कुशाग्रची हत्या केल्यानंतर प्रभासने त्याची स्कूटी उचलली. थोड्या दूर गेल्यानंतर आर्यनला स्कूटीवर बसवून घेतलं. कारण या स्कूटीवरूनच कुशाग्र रचिताच्या घरी गेल्याचा भास व्हावा यासाठी. आणखी थोडे अंतर पुढे गेल्यानंतर स्कूटीची नंवर प्लेट बदलली आणि कुशाग्रच्या घरी पोहोचला. इथे तो ३० लाखाच्या खंडणीचा कागद घरी फेकून फरार झाला. यात त्याने धार्मिक घोषणाही लिहिल्या होत्या. कारण पोलीस यातच अधिक काळ गुंतून पडावे.

घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधायला सुरुवात केली. परिसरातील लोकांची चौकशीही करण्यात येत होती. याच दरम्यान कुशाग्रच्या ट्युशन टीचरच नाव समोर आलं. रचिता सुरुवातीला कुशाग्रला त्याच्या घरी येऊन शिकवत होती. मात्र तिला काढून टाकण्यात आलं होतं. रचिताची चौकशी करताना प्रभासचं नाव समोर आलं. त्यानंतर दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. सुरुवातीला दोघांनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रभासची उपस्थिती आणि खंडणीच्या कागदावर प्रभासच्या हस्ताक्षरावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवल्यांनंतर दोघांनी सत्य सांगायला सुरुवात केली.

कुशाग्रचा खून,प्रेम प्रकरणातून झाल्याचं पुढे आलं. कुशाग्र आणि रुचिता यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय प्रभासला होता त्यामुळे आपण त्याची हत्या केल्याची कबुली प्रभासने दिली. खंडणीची मागणी केवळ पोलिसांना चकवा देण्यासाठी केली होती. कुशाग्र स्वतःच्या मर्जीने रचिताच्या घरी गेला होता. त्यानंतर प्रभास घरी आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. प्रभासचं घर रचिताच्या घरा शेजारीच आहे. नंतर प्रभास आणि रचिता घरातून बाहेर येतात मात्र कुशाग्र येत नाही. याच दरम्यान त्याची हत्या झाल्याचा संशय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT