बिझनेस

Youtube आणि Disney मध्ये तणाव! 31 ऑक्टोबरपासून बंद होणार 'हे' लोकप्रिय चॅनेल्स, युजर्सना मोठा धक्का

Disney Channel Blackout: Disney आणि YouTube यांच्यात डिजिटल राइट्स व स्ट्रीमिंग करारावरून वाद वाढला आहे. जर ३० ऑक्टोबरपर्यंत तोडगा निघाला नाही, तर ३१ ऑक्टोबरपासून ESPN, ABC यांसारखी लोकप्रिय चॅनेल्स YouTube वर बंद होणार आहेत.

Dhanshri Shintre

गुगलच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube आणि Disney यांच्यात डिस्ट्रीब्युशन व डिजिटल राइट्स संदर्भात सुरू झालेला वाद अधिक तीव्र झाला आहे. या वादाचा थेट परिणाम युजर्सवर होण्याची शक्यता आहे. Disney ने याबाबत चेतावणी देत स्पष्ट केले आहे की, जर ३० ऑक्टोबर रात्री ११:५९ वाजेपर्यंत दोन्ही कंपन्यांमध्ये नव्या स्ट्रीमिंग कराराला अंतिम स्वरूप मिळाले नाही, तर ३१ ऑक्टोबरपासून यूट्यूबवरील Disney चे लोकप्रिय चॅनेल्स जसे की ESPN, ABC आणि इतर नेटवर्क्स ऑफ-एअर होतील.

यामुळे ८ मिलियनहून अधिक युजर्सना आपल्या आवडत्या चॅनेल्सचा आनंद घेता येणार नाही. विशेष म्हणजे, याचा सर्वाधिक परिणाम स्पोर्ट्सप्रेमींवर होईल, कारण Disney कडे NFL, NBA आणि NHL सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धांचे प्रसारण अधिकार आहेत. Disney ने २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासूनच यूट्यूब टीव्हीवर चेतावणी दाखवण्यास सुरुवात केली आहे. उद्योग तज्ज्ञांचे मत आहे की, ही कारवाई गूगलवर दबाव आणण्याची एक युक्ती असू शकते.

Disney ने गूगलवर केले हे आरोप

Disney ने गूगलवर आरोप केला आहे की, कंपनी आपल्या नफ्यासाठी ग्राहकांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे. असा तणाव यापूर्वीही अनेक मोठ्या मीडिया कंपन्यांमध्ये पाहायला मिळाला आहे. अलीकडच्या काही महिन्यांत NBC Universal, Fox Corp आणि TelevisaUnivision या कंपन्यांमध्येही यूट्यूबसोबत डिजिटल राइट्स आणि फी संरचनेसंदर्भात वाद झाले होते.

याप्रकरणी युट्यूबने काय सांगितलं?

दरम्यान, यूट्यूबने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, कंपनी आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी नवा करार करण्याचा प्रयत्न करत आहे. Disney ने काही अटी ठेवल्या आहेत. ज्यामुळे सदस्यत्व शुल्क वाढण्याची शक्यता आहे. यूट्यूबने हे मत व्यक्त केले आहे की ते आपल्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तत्पर असून वाद लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill: सुकून भी गुलाबी होता है...; शहनाज गीलचा नवा गुलाबी लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update: छठ पूजेसाठी उत्तर भारतीय नागरिकांची रामकुंडावर मोठी गर्दी

YouTuber Attack : करण - अर्जुनची शहरात दहशत, सोशल मीडियावर बातमी व्हायरल केल्यानं युट्यूबरवर प्राणघातक हल्ला

Maharashtra Politics: कोकणात राणे विरुद्ध राणे राजकीय संघर्ष? VIDEO

Tuesday Horoscope: मंगळवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! गणपती बाप्पा करतील इच्छा पूर्ण, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT