Majhi Kanya Bhagyashree Yojana Saam Tv
बिझनेस

Majhi Kanya Bhagyashree Yojana: तुमच्या मुलीलाही मिळू शकतात 50 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे 'माझी कन्या भाग्यश्री योजना'

Government Schemes for Girl: तुमच्या मुलीलाही मिळू शकतात 50 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे 'माझी कन्या भाग्यश्री योजना'

साम टिव्ही ब्युरो

Majhi Kanya Bhagyashree Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकारे हे दोघेही वेगवेगळ्या योजना राबवतात. या योजनांमध्ये विमा, पेन्शन, रेशन, घर, वीज, रोजगार यासह इतर अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. एवढेच नाही तर देशातील मुलींसाठी विशेषत: अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत.

त्यातील एक म्हणजे 'माझी कन्या भाग्यश्री योजना'. या योजनेंतर्गत मुलींच्या जन्मावर शासनाकडून कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते. यातच तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमची या योजनेसाठी लागणारी पात्रता तपासून या योजनेत सहभागी होऊ शकता. आताच आपण माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत...

योजनेचे फायदे आणि पात्रता

या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मुलीच्या जन्मावर शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. कुटुंबातील दोन मुलींना हा लाभ मिळू शकतो, परंतु दोनपेक्षा जास्त मुली असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. तसे असल्यास तुम्ही या योजनेत अर्ज करू शकता.  (Latest Marathi News)

अर्ज कसा करावा?

  • तुम्हालाही या माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल.

  • अर्ज करण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. (Utility News in Marathi)

  • वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला येथून अर्ज डाउनलोड करावा लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि विचारलेली सर्व माहिती बरोबर टाकावी लागेल.

  • यानंतर, तुम्हाला या भरलेल्या फॉर्मसोबत विनंती केलेल्या कागदपत्राची प्रत जोडावी लागेल.

  • आता तुम्हाला फॉर्म आणि कागदपत्रे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागतील.

  • यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि सर्वकाही बरोबर असल्यास तुमच्या मुलीच्या नावे ५०,००० रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT