Elon Musk with his mother Saam Tv
बिझनेस

Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची आई झोपते गॅरेजमध्ये; नेमकं कारण काय?

Elon Musk Mother Sleep At Garage: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची आई गॅरेजमध्ये झोपते. याबाबत एलॉन मस्कची आई मेय मस्क यांनी स्वतः माहिती दिली आहे.

Siddhi Hande

जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हा एलॉन मस्क आहे.एलॉन मस्क यांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे. एलॉन मस्क हे त्यांच्या आईला गॅरेजमध्ये झोपवतात. अशी माहिती स्वतः मेय मस्क यांनी दिली आहे. अब्जाधीश एलॉन मस्क यांची आई गॅरेजमध्ये झोपते, ही खूपच आश्चर्याचकित करणारी गोष्ट आहे.

मेय मस्क या ७१ वर्षीय आहेत. त्या जेव्हा आपला मुलगा एलॉन मस्कच्या घरी जातात तेव्हा त्यांना गॅरेजमध्ये झोपावे लागतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या आईला गॅरेजमध्ये झोपावे लागते, हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याबाबत माहिती स्वतः मेय मस्क यांनी दिली आहे.

एलॉन मस्क यांच्या आईने सांगितले की, मी जेव्हा मुलाला भेटायला टेक्सासला जाते. तेव्हा मला गॅरेजमध्ये झोपावे लागते. त्याच ठिकाणी स्पेसएक्सचे (Spacex) मुख्यालय आहे.आमच्या या मुख्यालयाच्या बाजूला कोणतेही घर नाही, असेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनीही एका पॉडकास्टमध्ये याबाबत सांगितले होते. ते म्हणाले होते की, मी बोका चिका येथे खूप लहान घरात राहतो.त्याआधी २०२० मध्ये त्यांनी त्यांच्या सर्व गोष्टी विकल्याचेही सांगितले होते. त्यामुळे त्यांचे स्वतः चे घर नाही आहे. त्यामुळेच मेय मस्क या एलॉन मस्क यांच्या घरी गेल्यावर गॅरेजमध्ये झोपतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात स्कूलबस गेली वाहून

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

SCROLL FOR NEXT