Elon Musk India Visit: एलॉन मस्क पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर, PM मोदींना भेटणार; मोठी घोषणा करण्याची शक्यता

Elon Musk Meets PM Modi: टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आहेत. २२ एप्रिल रोजी मस्क पंतप्रधान मोदींना भेटणार आहे.
Elon Musk Meets PM Modi
Elon Musk Meets PM ModiSaam Tv

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर सांगितलं की, ते भारतात येऊन २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Elon Musk Meets PM Modi) भेटणार आहेत. भारत भेटीदरम्यान ते दोन ते तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

ई-वाहन उत्पादक टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क 22 एप्रिल रोजी भारताला भेट देणार आहेत. यादरम्यान ते दोन ते तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करू शकतात. याद्वारे येथे कारखाना उभारण्यात येणार (Elon Musk India Visit) आहे. या दौऱ्यात मस्क सोमवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मात्र, मस्क यांच्या भारतभेटीबाबत आणि त्यादरम्यान कोणतीही तपशीलवार अधिकृत माहिती शेअर केली जात नाही.

एलॉन मस्कने (Elon Musk) सोशल मीडियावर सांगितलं की, मी भारतात येणार आहे. तिथे पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश आहे. परंतु ई-वाहन उद्योग अजूनही बाल्यावस्थेत आहे. 2023 मध्ये, देशातील एकूण वाहन विक्रीमध्ये EV चा वाटा केवळ दोन टक्के होता. हा वाटा 30 टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे. एलॉन मस्कच्या भेटीशी संबंधित अमर उजालाच्या सूत्रांनी सांगितलं की, टेस्ला प्रमुख भारतातील त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम उघड करू शकतात, परंतु ही गुंतवणूक किती काळासाठी आणि देशाच्या कोणत्या राज्यात होणार आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.

मस्क ई-वाहनांवर आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत आहे. या वर्षी मार्चमध्ये भारत सरकारने ई-वाहनांच्या काही मॉडेल्सवरील आयात शुल्क 100 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा ((Elon Musk Investment In India) केली आहे, जर कार उत्पादकांनी भारतात कारखाने सुरू करण्यासाठी किमान 500 दशलक्ष गुंतवणूक केली असेल.

Elon Musk Meets PM Modi
Elon Musk : चीनमुळे एलॉन मस्क यांचे बुडाले तब्बल ३.३ लाख कोटी रुपये, काय आहेत कारणं? जाणून घ्या

22 एप्रिल रोजी टेस्लाचे मालक एलोन मस्क यांच्या भारत भेटीपूर्वीच, अर्थ मंत्रालयाने उपग्रहाशी संबंधित क्रियाकलापांमध्ये थेट विदेशी गुंतवणूक (FDI) ची मर्यादा शंभर टक्क्यांपर्यंत वाढवली (Elon Musk Meets PM Modi On 22 April) आहे. नियमात सुधारणा करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यापूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतराळ क्षेत्रातील काही उपक्रमांसाठी स्वयंचलित मार्गाने थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली होती.

या क्रियाकलापांमध्ये उपग्रह घटक आणि इतर प्रणालींचे उत्पादन समाविष्ट आहे. गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला भारतीय अंतराळ विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करावे (Elon Musk News) लागेल. उपग्रह उत्पादन, उपग्रह डेटा उत्पादने आणि ग्राउंड आणि वापरकर्ता विभागांसाठी 75 टक्के गुंतवणूकीची परवानगी आहे.

Elon Musk Meets PM Modi
Elon Musk: X युझर्ससाठी मोठी बातमी! आता X वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार, एलॉन मस्कने सांगितलं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com