ATM Transactions Rule Saam tv
बिझनेस

ATM Transactions: ऐका हो ऐका! एटीएममधून पैसे काढणं महागणार; जाणून घ्या किती लागेल चार्ज

ATM Transactions Rule: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनटीपीसी) पाठवलेला एटीएम शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव आरबीआयने स्वीकारलाय. व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर फी वाढवण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलाय.

Bharat Jadhav

जर तुम्ही एटीएममधून वारंवार पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गरजेसाठी वारंवार एटीएममधून पैसे काढण्याची सवय तुम्हाला असेल तर ती सवय बदलू घ्या, नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम इंटरचेंज फी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. त्यामुळे होम बँक नेटवर्कच्या बाहेर असलेल्या एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे. इतकेच नाही तर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून तुम्ही साधं तुमचा बॅलन्स तपासला तरी त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे.

हो, जर तुमचे खाते हे महाराष्ट्र बँकेत असेल आणि तुम्ही ती बँक सोडून दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल तर अधिक चार्ज लागणार आहे. याआधी खाते असलेल्या बँकेच्या एटीएमऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जात तेव्हा तुम्हाला १७ रुपये द्यावे लागत होते. जे आता १९ रुपये झाले आहेत. यापूर्वी दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून शिल्लक तपासण्यासाठी ६ रुपये द्यावे लागत होते. आता एका व्यवहारावर ७ रुपये शुल्क आकरले जातील.

ही गोष्ट ठेवा डोक्यात?

दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून ट्रांजेक्शन फी तेव्हाच वसूल केली जाईल जेव्हा तुम्ही फ्री ट्रांजेक्शनची लिमीट पार केली तरच तुम्हाला शुल्क भरावं लागेल. मेट्रो शहरांमध्ये, होम बँक व्यतिरिक्त इतर बँकांच्या एटीएममधून विनामूल्य व्यवहारांची मर्यादा 5 आहे, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये, विनामूल्य व्यवहारांची मर्यादा 3 आहे.

नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने आरबीआयकडे एटीएमचे शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव आरबीआयने मान्य केलाय. वाढत्या ऑपरेटिंग खर्चामुळे जुन्या फीमध्ये सेवा देणे कठीण होत असल्याने एटीएमममधून ट्रांजेक्शन फी वाढवण्यात आलीय.

व्हाइट लेबल एटीएम म्हणजे काय?

लहान शहरे आणि गावांमध्ये एटीएम सुविधा देण्यासाठी तेथे बँकेचे नाव नसलेले एटीएम बसवण्याची परवानगी आरबीआयने दिलीय. एटीएम पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम कायदा 2007 अंतर्गत, आरबीआयने कोणत्याही बँकेचा बोर्ड नसलेले एटीएम बसवण्याची परवानगी दिलीय. या एटीएममधून डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून पैसे काढता येतात. यासोबतच बिल पेमेंट, मिनी स्टेटमेंट, चेक बुक रिक्वेस्ट, कॅश डिपॉझिट आदी सुविधाही उपलब्ध असते, यालाच व्हाइट लेबल एटीएम म्हटलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT