ATM Saam Tv
बिझनेस

ATM: आता ATM मधून कॅश काढणे महागणार; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ATM Cash Withdrawl Fees May Be Increase: बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता एटीएममधून कॅश काढणे महाग होणार आहे. बँक एटीएममधून रोख रक्कम काढण्याचे शुल्क वाढवण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

आजकाल सर्वजण डिजिटल पेमेंटचा खूप जास्त वापर करतात. परंतु काही कामांसाठी आपल्याकडे कॅश असणे गरजेचे आहे. रोख रक्कमेसाठी तुम्हाला एटीएममधून पैसे काढावे लागतात.दरम्यान, बँकेच्या ग्राहकांना झटका बसणार आहे. एटीएममधून पैसे काढणे आता महाग होणार आहे. एटीएममधून कॅश काढण्यासाठी शुल्क वाढवले जाऊ शकते. यामुळे ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी वाढीव पैसे द्यावे लागणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India)सध्या ५ वेळा एटीएममधून कॅश काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. परंतु आता एटीएममधून पैसे काढणाऱ्यावर जास्त शुल्क आकारु शकते. मिडिया रिपोर्टनुसार, तुम्हाला आता एटीएममधून पैसे काढताना जास्त शुल्क भरावे लागणार आहे.

किती शुल्क भरावे लागणार?

मिडिया रिपोर्टनुसार, NPCI ने पाचवेळा एटीएममधून पैसे काढण्यावर कोणतेही शुल्क आकारत नाही. परंतु त्यानंतर जर तुम्ही कॅश काढत असाल तर तुम्हाला २१ रुपये चार्ज पडतो. परंतु आता हे शुल्क वाढवण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला २२ रुपये शुल्क भरावे लागू शकते. त्यामुळे ५ ट्रान्झॅक्शननंतर प्रत्येक कॅश विड्रॉवलसाठी २२ रुपये मोजावे लागतील. याचसोबत एनपीसीआयने रोख रक्कमेच्या व्यव्हारासाठी एटीएम इंटरचेंज फी १७ रुपयांवरुन १९ रुपये करण्याची शिफारस केली आहे.

रिपोर्टनुसार, बँक आणि व्हाइल लेबल एटीएम ऑपरेटर मेट्रो आणि नॉन मेट्रो शहरात शुल्क वाढवण्याच्या माताशी सहमत आहे. परंतु रिझर्व्ह बँक आणि NPCI ने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. रिपोर्टनुसार, वाढती महागाई, ट्रान्सपोर्टेश खर्च आणि कॅश रिप्लेनिशमेंटसाठीचा खर्च वाढत आहे. त्यामुळेच हे शुल्क वाढवण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT