Gold rate update Saam tv
बिझनेस

Explainer : सोन्याचा भाव 1,21000 रुपयांवर पोहोचला, काय आहे तेजीचं कारण? जाणून घ्या

Gold rate update : सोन्याचा भाव १२१००० रुपयांवर पोहोचलाय. सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या.

Vishal Gangurde

सध्या सोन्याचा दर प्रति तोळा 1,21,000 रुपयांवर

डॉलरमध्ये घट आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेचा परिणाम

सणासुदीमुळे भारतात सोन्याची मागणी वाढली

सोन्याचा दरात दिवसेंदिवस तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याचा दर प्रतितोळा १ लाख २१ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोन्याच्या दराने आतापर्यंतची उच्चांकी गाठली आहे. सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात नेमकी वाढ का होत आहे, जाणून घेऊयात.

अमेरिकेच्या धोरणामुळे भारतात सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे. अमेरिकेतील शटडाऊनमुळे डॉलरच्या भावात घसरण होत आहे. तसेच या शटडाऊनमुळे अमेरिकेतील सरकारी सेवेवरही परिणाम होत आहे. जागतिक पातळीवर महागाई आणि मंदीची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अमेरिकेने टॅरिफ आणि परदेशी धोरणात बदल केल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानेही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे सणासुदीत मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली जाऊ शकते.

अमेरिकी डॉलर इंडेक्स यावर्षी ९.५१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. २०१७ सालानंतर अमेरिकी चलनात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. यंदा तीन वर्षांची उच्चांकी पातळी ११०.१८ वर पोहोचलेला हा इंडेक्स आज मंगळवारी ९८.२० वर पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला एमसीएक्सवर सोन्याचा भावात यावर्षी ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा दर १० ग्रॅम १२०,९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

जगातील आर्थिक अस्थिरता, डॉलरमधील घसरण, सणासुदीच्या काळात गुंतवणूकदारांचा सोन्यावरील विश्वासामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत . त्यामुळे येत्या काळात सोन्याची तेजी सुरुच राहणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहेरच्या काजळावर विश्वास नाही? मग घरच्या घरी तयार करा लाँग लास्टिंग काजळ

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Yavatmal Politics: ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी; काय आहे प्रकरण?

Pune Honeytrap: PMPML मधील कंडक्टर महिलेचा प्रताप, तिघांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं, आता स्वतःच अडकली

SCROLL FOR NEXT