CJI Bhushan Gawai : सुप्रीम कोर्टातील हल्ल्यानंतर PM मोदींचा सरन्यायाधीशांना फोन, दोघांमध्ये काय संवाद झाला?

CJI Bhushan Gawai News : सुप्रीम कोर्टातील हल्ल्यानंतर PM मोदींचा सरन्यायाधीशांना फोन केला. दोघांमध्ये काय बोलणं झालं, जाणून घ्या.
CJI Bhushan Gawai News
CJI Bhushan Gawai Saam tv
Published On
Summary

कोर्टरूममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा सरन्यायाधीश गवई यांना फोन

नरेंद्र मोदींनी कोर्टातील घटनेबाबत माहिती घेतली.

हल्ल्यानंतर गवई यांनी दाखवलेल्या संयमाचे पीएम मोदींनी कौतुक केलं.

सुप्रीम कोर्टातील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश गवई यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी कोर्टरुममधील हल्ल्याविषयी विचारपूस केली. हल्ल्यानंतरही शांतता आणि संयम राखल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश गवई यांचं कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भुषण गवई यांच्याशी संवाद साधल्याची माहिती दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'मी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या फोनवरून संवाद साधला. सुप्रीम कोर्टात आज त्यांच्यावर हल्ला झाल्याने भारतीयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या निषेधार्ह कृत्यांना मुळीच जागा नाही. सुप्रीम कोर्टात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे'.

CJI Bhushan Gawai News
Pune Politics : पुण्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा; धंगेकर-रासने पुन्हा आमनेसामने, नेमकं काय बिनसलं?

'हल्ला घडल्यानंतरही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शांतता आणि संयम दाखवला, त्याचं मनापासून कौतुकास्पद मानतो. सरन्यायाधीश गवईंची न्यायमूल्यांप्रती निष्ठा आहे. संविधानाच्या आत्म्याला बळकटी देण्याचा प्रयत्नांची ही साक्ष आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

राहुल गांधी काय म्हणाले?

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनीही केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवरी पोस्ट करत म्हटलं की, सरन्यायाधीशांवरील हल्ला हा न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि संविधानाच्या आत्म्यावर झालेला आघात आहे. या प्रकारच्या द्वेषाला देशात मुळीच जागा नाही. त्याचा कठोर निषेध व्हायला हवा'.

काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्याखडून घटनेचा निषेध

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यावर अमरावतीचे कांग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. 'सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात मनुवादी विचारसरणीच्या वकिलाकडून जो भ्याड हल्ला झाला, त्याचा जाहीर निषेध करतो. तसेच येणाऱ्या काळात जनता त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. सरन्यायाधीश भूषण गवई यांची संपूर्ण सुरक्षितेचे जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com