Kamaltai Gawai : एकजीव आणि सक्षम राष्ट्र निर्माण करायला हवं; कमलताई गवईंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय सल्ला दिला?

Kamaltai Gawai News : कमलताई गवईंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी पत्राद्वारे संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
Kamaltai Gawai News
Kamaltai Gawai saam tv
Published On
Summary

अमरावतीत RSS चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आलं होतं

कमलताई गवईंनी या प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थिती दर्शवली.

त्यांनी कार्यक्रमासाठी संघाला शुभेच्छा संदेश पाठवला.

अमर घटारे, साम टीव्ही

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी अमरावतीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा संदेश दिला. आजच्या कार्यक्रमाला कमलताई गवई यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आलं होतं. वाद निर्माण झाल्यानंतर प्रकृतीचं कारण देत कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज झालेल्या कार्यक्रमाला कमलताई गवई यांनी पत्रातून शुभेच्छा दिल्या.

कमलताई गवई यांनी लिहिलेले शुभेच्छापत्र

प्रति,

उत्सवश्री बपोरीकर

महानगर संघचालक

अमरावती

मानवी जीवन मानवतेच्या मूल्यांनी विकसित झाले असून भारतीय संस्कृती आणि सभ्यदा जगाच्या परिप्रेक्षामध्ये

सर्वोत्कृष्ट आहे. भारत हा प्राचीन कालापासून धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्ट्या जगाच्या शिखरावर आदर्श राहिलेला देश आहे. तथागत बुध्द,वर्धमान महावीर, सम्राट अशोक, संत कबीर,संत तुकाराम,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी,स्वामी विवेकानंद,रामस्वामी पेरियार डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांनी मानवी मूल्याला विकसित करणारी थोर परंपरा भारतामध्ये निर्माण केली आहे.

Kamaltai Gawai News
Political News : निवडणूक बिहारमध्ये अन् उलथापालथ दुसऱ्या राज्यात, थेट मुख्यमंत्री बदलणार? भाजप नेत्याचा मोठा दावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मनिरपेक्षता यांच्या आधारावर भारतीय संविधानाची उभारणी केली ती आज भारतात आणि भारतीय नागरिकांना विकासाकडे घेऊन जात आहे.

भारत हा सामाजिक सांस्कृतिक भावी भाषिक दृष्ट्या वैद्यने नटलेला देश असून आजपर्यंत लोकशाही मूल्यांना केंद्रावरती ठेवून त्याची विकासाकडे वाटचाल चालू आहे. भारताला आपल्याला एकजीव व सक्षम असे राष्ट्र म्हणून निर्माण करायचे आहे. म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मनिरपेक्ष यांच्या माध्यमातून निर्माण करता येईल.

Kamaltai Gawai News
Cough Syrup : कफ सिरप प्रकरणानंतर महाराष्ट्रात अलर्ट; अन्न व औषध प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनाही उपरोक्त मानवी आणि संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून भारतात सक्षमराष्ट्र म्हणून विकसित करण्याची अधिक संधी आहे.

आज दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्तर पूर्ती वियाजयंती उत्सव संपन्न होत असून सदर कार्यक्रमास मी काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नाही. या कार्यक्रमासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.

संपूर्ण मंगलमैत्री सह..

(डॉ. कमल रा. गवई)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com