India's Most Charitable Person Saam Tv
बिझनेस

Shiv Nadar: ना टाटा, ना अंबानी.. भारतामधील हा व्यक्ती आहे सर्वात मोठा दानशूर; तब्बल २,१५३ कोटी रूपये केले दान

India's Most Charitable Person: भारतातील सर्वात दानशूर व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात टाटा किंवा अंबानी नव्हे तर शिव नाडार हे सर्वाधिक दानशूर व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.

Siddhi Hande

Latest Business News: प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात काही न काही दान करायला हवे, लोकांची मदत करायला हवी. प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार दानधर्म करतात. दरम्यान, भारतात दानशूर व्यक्तिमत्तव कोण होते असे विचारले तरी आपसूकच टाटा हे नाव तोंडात येते. नुकतीच भारतातील दानशूर व्यक्तींची नवीन यादी जाहीर झाली आहे. ज्यामुळे सर्वाधिक रक्कम कोणी दान केली आहे याची माहिती देण्यात आली आहे.

हुरुन इंडिया १०१४ ने ही यादी प्रसिद्ध केली आहे. यात भारतात टॉप १० दानशूर व्यक्तींची नावे देण्यात आली आहे. या सर्वाधिक दानधर्म करणारा व्यक्ती टाटा किंवा अंबानी नसून शिव नाडार आणि त्यांचे कुटुंब आहे.

टाटा कंपनीने सर्वसामान्य लोकांसाठी अनेक कामे केली आहेत. दानशूर लोकांच्या यादीत टाटांचे नावदेखील आहे. दानशूर व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावर शिव नाडार आणि त्यांचे कुटुंब आहे. त्यांनी २,१५३ रुपये दान केले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुकेश अंबानी, बजाज, कुमार मंगलम बिर्ला कुटुंबी आणि गौतम अदानी आहेत. या सर्वांनी मिळून २०२४ मध्ये ४,६२५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

यादीनुसार, HCL संस्थापक शिव नाडार (७९) यांनी २०२४ मध्ये ५ टक्के मालमत्ता दान केली आहे. शिव नाडार यांनी १९९४ मध्ये फाउंडेशनची स्थापना केली. त्यांनी दररोज ५.९ कोटींचे दान केले आहे.

मुकेश अंबानी यांनी ४०७ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. बजाज कुटुंबाने ३५२ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी मागच्या वर्षाच्या तुलनेत जास्त रक्कम दान केली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांनी ३३४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यानंतर गौतम अदानी यांनी ३३० कोटी रुपयांचे दान केले आहे. त्यानंतर देशातील इतर अनेक व्यावसायिकांनी खूप जास्त दान केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांनाही म्हटलो मी इकडे आलो, तुमचं तिकडे काय काम ? - रामदास आठवले

Deepika- Ranveer Daughter Dua: लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच स्पॉट झाले दीपिका अन् रणवीर; एअरपोर्टवरचा VIDEO व्हायरल

VIDEO : मोदींच्या प्रचाराचा नारळ धुळ्यात का फुटला? फडणवीसांनी सांगितलं कारण | Marathi News

Winter Season: हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा

Gita Jain : अपक्ष म्हणून धाकधूक नाही, पण तिकीट नाकारल्याची खंत; गीता जैन यांची सडेतोड टीका

SCROLL FOR NEXT