IAS Mittali Sethi Saam Tv
बिझनेस

IAS Mittali Sethi: कोण आहेत नंदुरबारच्या IAS मिताली सेठी? दोन्ही मुलांचे घेतलेय सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन

Nandurbar IAS Mittali Sethi Success Story: आयएएस मिताली सेठी यांनी सर्वंसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे सरकारी शाळेत अॅडमिशन केले आहे.

Siddhi Hande

IAS मिताली सेठी यांचा आदर्श

दोन्ही मुलांचे केले सरकारी शाळेत अॅडमिशन

आधी डॉक्टर झाल्या मग दिली UPSC

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. मिताली सेठी या तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या स्वतः आपल्या मुलांना सोडवण्यासाठी आल्या होत्या. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिताली यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

मिताली या नंदुरबारमध्ये जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्या नेहमीच आपल्या कामातून सर्वांना फायदा कसा होईल. याचा विचार करत असतात. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

आयएएस मिताली सेठी कोण आहेत? (Who is IAS Mittali Sethi)

आयएएस मिताली सेठी या पंजाबमधील जालंधरच्या रहिवासी आहेत. त्यांचे बालपण तिथेच गेले. त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डेंटल क्षेत्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएश केले. यानंतर त्यांनी मास्टर्स डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी प्रॅक्टिसदेखील सुरु केली.

मिताली सेठी या प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या मनात यूपीएससी देण्याचा विचार आला. त्यांना त्यांचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे. डॉ. मिताली यांनी पहिल्या दोन प्रयत्नात अपयश मिळाले. परंतु त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. त्यांना तिसऱ्या प्रयत्नातदेखील अपयश मिळाले. परंतु त्या डगमगल्या नाही. त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. २०१६ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

मिताली सेठी यांनी नक्षलग्रस्त भागात काम केले आहे. त्या नागपूर, गडचिरोली या भागात कार्यरत होत्या. त्यांनी अनेक आदर्श ठेवले आहेत. त्यांनी आपले ब्रेस्ट मिल्क दान केले होते. त्यांच्या मते, आईचे दूध हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात जाऊन ब्रेस्ट मिल्क दान केले.

दोन्ही मुलांचे सरकारी शाळेत अॅडमिशन (Nandurbar IAS Mittali Sethi)

मिताली सेठी यांना दोन जुळी मुले आहेत. त्यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत घातले आहेत. या शाळेत आदिवासी मुलांची संख्या जास्त आहे. मुलांना सरकारी शाळेत उत्तम शिक्षण मिळू शकते, यावर त्यांचा विश्वास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

रत्नागिरीच्या MIDCमध्ये वेश्याव्यवसाय, पुण्यातील २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू; पोलिसांकडून पर्दाफाश

Maharashtra : ७ महिन्यात १४ लाख मतदार वाढले, विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपादरम्यान धक्कादायक आकडेवारी समोर; VIDEO

Deepika Padukone: ८ तासांची शिफ्ट की ५ स्टार ट्रीटमेंट; दीपिका पदुकोणने नक्की का घेतली 'कल्कि २८९८ एडी'मधून एक्झिट

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे भव्य चिंतन शिबिर, ५०० हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग

SCROLL FOR NEXT