Whatsapp google
बिझनेस

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर; व्हिडीओ कॉल करणं आता झालं अधिक सोपं

whatsapp new feature: जगभरात अधिक वापरले जाणारे व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्यासाठी नवनवीन फिचर घेऊन येत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात अधिक वापरले जाणारे व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्यासाठी नवनवीन फिचर घेऊन येत असतात. एचडी क्वालिटी फोटो, व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस स्टेटस असे अनेक वेगवेगळे नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅपने आतापर्यंत आणले आहेत. तसेच भविष्यात आणखी काही नवीन फिचर आणण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच आता व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन अपडेटेड फीचर लाँच केले आहे.

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडीओ कॉलिंगसाठी एक नवीन फिचर लाँच केल आहे. लो-लाइट मोड हा नवीन फिचर व्हिडीओ कॉल फीडमधील ब्राइटनेस कमी करुन करुन व्हिडीओ कॉलची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो म्हणजेच आता आपल्याला कमी प्रकाशातही व्हिडीओ क़ॉल करता येऊ शकणार.

हा लो-लाइट मोड फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉलिंगवर अधिक चांगला अनुभव देईल. याव्यतिरिक्त व्हिडीओ कॉलिंगमध्ये नवीन फिल्टर आणि बॅकग्राउंड ऑप्शन्सदेखील जोडण्यात आले आहेत. कमी प्रकाशात यूजर्सना चांगला व्हिडीओ गुणवत्ता देण्यासाठी कंपनीने लो-लाइट मोड डिझाइन केले आहे, हे व्हिडिओमधील चमक तसेच ग्रेनेस कमी करण्यास मदत करते.

व्हॉट्सअ‍ॅपचा लो-लाइट मोड वापरणे खूप सोपे आहे. पहिल्यांदा तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप उघडा. यानंतर तुमच्या फोनवरुन व्हिडीओ कॉल करा. आता कॉल केल्यानंतर व्हिडीओ फीडवर क्लिक करा आणि ते पूर्ण स्क्रिनवर उघडा. तिथे लो-लाइट हे फिचर सक्षम करण्यासाठी बल्ब आयकॉनवर क्लिक करा असे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल दरम्यान लो-लाइट मोड सुरु करु शकता. व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी आणण्यात आले आहे. फीचर आता डेस्कटॉप व्हर्जनसाठी उपलब्ध नाही. यासोबतच यूजर्सला प्रत्येक कॉलसाठी हे फीचर सुरू करावे लागेल.

Written By: Dhanshri Shintre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: पुण्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस सामना, कोण मारणार बाजी?

Maharashtra News Live Updates: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं सोलापूर शहरात आगमन

Stock Market Updates: ट्रम्प सरकार येताच शेअर बाजारात उसळी, टेक्नोलॉजीचे स्टॉक्सने घेतली भरारी

Maharashtra Politics: जाहिरातीवर खर्च केला नसता तर..., 'लाडकी बहीण' योजनेवरून ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर निशाणा

Raha Kapoor Birthday: फक्त दोन वर्षात तिनं खूप काही जिकलं...

SCROLL FOR NEXT