WhatsApp new feature for international travelers without SIM swap saam tv
बिझनेस

WhatsApp Update : व्हॉट्सॲपचा भन्नाट फीचर! परदेशातही मिळणार इंटरनेट, नंबर बदलण्याची गरजच नाही

WhatsApp new feature : परदेशात प्रवास करताना आता नवीन सिम कार्ड घेण्याची किंवा तुमचा जुना नंबर बदलण्याची अजिबात गरज नाही. व्हॉट्सॲप आणतयं नवीन फीचर ते कसं काम करेल जाणून घ्या.

Saam Tv

परदेशात प्रवास करताना इंटरनेट वापरण्यासाठी स्थानिक सिमकार्ड खरेदी करावे लागते किंवा महागड्या आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकचा पर्याय निवडावा लागतो. मात्र, आता प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी व्हॉट्सॲप एक नवे फीचर आणत आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना थेट व्हॉट्सॲप वरूनच ट्रॅव्हल eSIM डेटा प्लॅन खरेदी आणि इन्स्टॉल करता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी अॅपच्या बाहेर जाण्याचीही गरज भासणार नाही.

व्हॉट्सॲप वरूनच खरेदी करता येणार eSIM

व्हॉट्सॲपच्या नव्या सुविधेमुळे परदेशात जाण्यापूर्वीच प्रवाशांना त्यांच्या इच्छित ठिकाणासाठी उपलब्ध असलेले डेटा प्लॅन पाहता येतील. त्यानंतर आवडता प्लॅन निवडून काही टप्प्यांत eSIM खरेदी आणि इन्स्टॉल करता येईल. त्यामुळे विमानतळावर उतरल्यावर स्थानिक सिमकार्ड शोधण्याची किंवा सार्वजनिक वाय-फायवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल.

Jio सह अनेक कंपन्यांसोबत भागीदारी

या सुविधेसाठी व्हॉट्सॲपने अनेक टेलिकॉम कंपन्या आणि eSIM सेवा पुरवठादारांसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये भारतातील रिलायन्स जिओसह Smart Axiata, Smart Communications आणि Verizon या कंपन्यांचा समावेश आहे. ही सुविधा सुरुवातीला काही निवडक देशांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे.

जुन्याच नंबरवर वापरता येणार व्हॉट्सॲप

या फीचरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे परदेशात गेल्यानंतरही वापरकर्त्यांना त्यांच्या जुन्या व्हॉट्सॲप नंबरवरूनच चॅटिंग करता येईल. ट्रॅव्हल eSIM चा वापर इंटरनेट डेटा मिळवण्यासाठी करता येणार असल्याने मुख्य सिमकार्ड किंवा व्हॉट्सॲप खाते बदलण्याची गरज भासणार नाही.

कोणत्या मोबाईलमध्ये मिळणार सुविधा?

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये eSIM सपोर्ट असणे आवश्यक आहे. म्हणजेच सर्व मोबाईल वापरकर्त्यांना ही सुविधा वापरता येणार नाही. eSIM सपोर्ट असलेल्या अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.

फीचर कधी सुरू होणार?

व्हॉट्सॲप लवकरच काही निवडक देशांमध्ये हे फीचर सुरू करणार आहे. मात्र, भारतात ही सुविधा नेमकी कधी उपलब्ध होईल, याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तसेच डेटा प्लॅनच्या किमती, इंटरनेटची मर्यादा आणि वैधतेबाबतही कंपनीने सविस्तर माहिती दिलेली नाही.

प्रवाशांसाठी ठरणार फायदेशीर सुविधा

व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरमुळे परदेशात इंटरनेट वापरणे अधिक सोपे होऊ शकते. स्थानिक सिमकार्ड खरेदी करण्याची धावपळ आणि महागड्या रोमिंग पॅकवरील अवलंबित्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : जिल्हाधिकाऱ्यांचं व्हॉट्सअॅप पुन्हा हॅक! महसूल अधिकाऱ्यांना खटाखट मेसेज, प्रत्येकाकडे ३० हजारांची मागणी

डिलिमिटेशननंतर महाराष्ट्राचा दिल्लीत दबदबा वाढणार? केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार? VIDEO

पांढरं आणि निळ्या आधार कार्डात काय फरक? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार! सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

शेख हसीना बांग्लादेशात परतणार? बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार उफाळणार?

SCROLL FOR NEXT