The 'META' Company Clearly Stated In The Delhi High Court That Whatsapp Will Go Out Of India If They Force To Break Encryption Saam Tv
बिझनेस

WhatsApp to Delhi HC: ...तर व्हॉट्सॲप भारतातून निघून जाईल; 'मेटा' कंपनीने दिल्ली हायकोर्टात स्पष्टच सांगितलं

WhatsApp On Exiting From India: सध्याचे जग संपूर्ण डिजिटल झाले आहे. डिजिटल जगात व्हॉट्सॲपचा वापर सर्वात जास्त केला जात आहे. परंतु आता व्हॉट्सॲप भारतातून जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.. दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत व्हॉट्सॲपच्या वकिलांनी माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याचे जग संपूर्ण डिजिटल झाले आहे. डिजिटल जगात व्हॉट्सॲपचा वापर सर्वात जास्त केला जात आहे. परंतु आता व्हॉट्सॲप भारतातून जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.. दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत व्हॉट्सॲपच्या वकिलांनी माहिती दिली आहे.

'आम्हाला एनस्क्रिप्शन तोडण्यास सांगितले, तर व्हॉट्सॲप भारतातून निघून जाईल', असे कंपनीने सांगितले. आयटी फर्मच्या याचिकेवर सुनावणी करत असताना ही माहिती दिल्ली उच्च न्याययाला व्हॉट्सअॅपच्या वकिलाने दिली आहे. 'एंड टू एंड एन्क्रिप्शन हे युजर्सच्या गोपनियतेचे रक्षण करते. हे मेसेज फक्त मेसेज पाठवणारा आणि मेसेज वाचणारा व्यक्तीचा जाणून घेऊ शकतात'असं व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाने इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी नियम २०२१ ला आव्हान देताना व्हॉट्सअॅपने सांगितले आहे.

मीडिया वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपची बाजू मांडण्यास वकील तेजस कारिया यांनी सांगितले की, 'एक प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही सांगत आहोत की जर आम्हाला एन्क्रिप्शन तोडण्यास सांगितले तर व्हॉट्सअॅप भारतातून जाईल. लोक व्हॉट्सअॅपचा वापर प्रायव्हसी फीचर्समुळे करतात. हे प्रायव्हसी फीचर कंपनीने दिले आहे. व्हॉट्सअॅपचे भारता ४०० दक्षलक्षाहून अधिक युजर्स आहेत. त्यामुळे भारत हे सर्वात मोठे मार्केट आहे'.

'व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाने आयटी नियम २०२१ ला आव्हान दिले आहे. ज्यात चॅट ट्रेस करण्यास आणि मेसेज पाठवणाऱ्यांची ओळख करण्यास सांगितले आहे. हा कायदा एन्क्रिप्शन कमकुवत करतो आणि भारतीय संविधानानुसार युजर्सच्या गोपनियतेचे उल्लंघन करतो', असे त्यांनी युक्तीवादात सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT