मार्क झुकरबर्गच्या 'मेटा'ने तासाभरात गमावले ८२९ कोटी; Facebook-Instagram डाऊनचा फटका

Why Facebook Instagram Down : जगभरात फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे कोटयवधी युजर्स आहे. याचा वापर करुन लांब असणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधता येतो. परंतु, काल रात्री अचानक फेसबुक-इन्स्टाग्राम डाउन झाल्याची माहिती मिळाली.
Facebook-Instagram down
Facebook-Instagram downSaam Tv

FB- Insta Down :

जगभरात फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे कोटयवधी युजर्स आहे. याचा वापर करुन लांब असणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधता येतो. परंतु, काल रात्री अचानक फेसबुक-इन्स्टाग्राम डाउन झाल्याची माहिती मिळाली.

जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम डाउन झाल्यामुळे अनेक युजर्सचे अकाउंट आपोआप लॉगआउट झाले. युजर्सने याचा संताप X (Twitter)वर व्यक्त केला. फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाउन झाल्यामुळे मार्क झुकरबर्गचे कोट्यवधीने नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

काल तासाभरात करबर्गला ८२९ कोटी गमवावे लागले. हे अशावेळी घडले जेव्हा अमेरिकन बाजार व्यवहार करत होते. त्याचा थेट परिणाम मेटाच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. कंपनीचे शेअर्स १.६० टक्क्यांनी घसरले. शेअरची किंमत (Price) USD 490.22 प्रति इतकी झाली.

Facebook-Instagram down
Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावाने गाठली उच्चांक पातळी, चांदीच्या दरातही भरमसाठ वाढ; वाचा आजचे दर

इंस्टाग्राम, फेसबुक (Facebook) व्यतिरिक्त, थेड्रस आणि व्हॉट्सअॅपला देखील काही समस्या आल्याची नोंद मिळाली. फेसबुक आणि इन्स्टाग्राम (Instagram) डाउन होण्याची ही अशी पहिलीच वेळ नाही. काल सोशल साइट्स डाउन झाल्यानंतर मेटाकडून युजर्सची माफी देखील मागण्यात आली.

Facebook-Instagram down
Most Dangerous Fort In Maharashtra : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाराष्ट्रातील भयावह किल्ले, निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सप्रेमींना पडते भुरळ!

२०२२ साली देखील ही समस्या नोंदवण्यात आली होती. जगभरातील सर्व इंटरनेट सर्व्हिसेस डाउन झाल्याची माहिती मिळाली. याच कारण Cloudflare डाऊन झाल्याचं सांगण्यात येत आहे. Cloudflare जगातील सर्वात मोठी इंटरनेट सर्व्हिस आणि सिक्योरिटी कंपनी आहे. ही कंपनी जगभरातील कंपन्यांना सर्व्हिस देते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com