मार्च महिना म्हटलं की, सणसमारंभ आणि लग्नसराईचा काळ सुरु होतो. परंतु मार्च महिना सुरु झाला आणि सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मागच्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ सुरु आहे.
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांना जोरदार झटका मिळाला आहे. अशातच सोन्याचे दर लवकरच ७० हजारांचा आकडा पार करु शकतात अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
१ मार्च ते ५ मार्चपर्यंत सोन्याच्या दरात २००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. यापूर्वी सोन्याच्या दराने डिसेंबर२०२३ मध्ये उच्चांकाची पातळी ओलांडली होतील. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे दर
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,९६१ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६५,०१० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीतही (Price) वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७४,८०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार १०० रुपयांनी वाढ झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)
मुंबई- ६५,१३० रुपये
पुणे - ६५,१३० रुपये
नागपूर - ६५,१३० रुपये
नाशिक - ६५,१६० रुपये
ठाणे - ६५,१३० रुपये
अमरावती - ६५,१३० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.