WhatsApp New Feature Saam tv
बिझनेस

WhatsApp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या कामाची बातमी! आता मेसेज करा शेड्युल; बर्थडेला बरोबर १२ वाजता जाणार मेसेज

WhatsApp New Schedule Messages Feature: व्हॉट्सअॅप लवकरच नवीन फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज शेड्युल करु शकणार आहात.

Siddhi Hande

व्हॉट्सअॅप लवकरच करणार नवीन फीचर लाँच

मेसेज करता येणार शेड्युल

तुम्ही हव्या त्या वेळेला मेसेज करता येणार शेड्युल

जगभरातील कोट्यवधी लोक रोज व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहे. काही क्लिकवर तुम्ही मेसेज पाठवू शकतात. व्हॉट्सअॅपमुळे अनेक कामे झटपट होतात. व्हॉट्सअॅप नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी वेगवेगळे फीचर्स लाँच करत असतात. व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन फीचरमध्ये तुम्हाला आता मेसेज शेड्युल करता येणार आहे.

अनेकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत जागे राहावे लागते. अनेकदा आपण खूप गोष्टी विसरतो त्यामुळे आता तुम्हाला रिमायंडर मिळणार आहे. तुमचे मेसेज तुम्ही शेड्युल करु शकतात. ज्या वेळी तुम्हाला तो मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवायचा आहे तेव्हा तो त्या व्यक्तीपर्यंत पोहचेल. त्यामुळे युजर्सला खूप फायदा होणार आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या फिचरवर काम सुरु आहे. सर्वात आधी आयफोन युजर्ससाठी हे फीचर सुरु होईल. यानंतर फीचर हळूहळू सर्वांसाठी सुरु होईल.

शेड्युल मेसेज फीचर कसं काम करणार? (Whatsapp New Scheduled Message Feature)

व्हॉट्सअॅपवर तुम्हाला एका वेळेसाठी मेसेज शेड्युल केला तर तो त्याचवेळी समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचणार आहे. तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीचे चॅट ओपन कराल तिथे तुम्हाला हा मेसेज दिसेल. त्यासाठी एक वेगळे सेक्शन असेल. त्यामुळे तुम्हाला किती मेसेज शेड्युल आहे हे समजले. तुम्ही या मेसेजला मॅनेज करु शकतात.

जर तुम्ही मेसेज शेड्युल केला तर तो डिलिव्हर होईपर्यंत तुम्ही त्यामध्ये एडिटिंग करु शकतात.याचसोबत तुम्हाला डिलिटदेखील करता येईल. याबाबत समोरच्या व्यक्तीला कोणतेही नोटिफिकेशन जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर - शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77 कोटी रुपयांची थकबाकी

Famous Singer : "तुझा रेट काय आहे?"; भर कार्यक्रमात प्रसिद्ध गायिकेला प्रश्न, तिने चप्पलेने दिला प्रसाद, पाहा VIDEO

Hairbrush Cleaning Tips: केसांचा ब्रश स्वच्छ कसा करायचा?

Kolhapur Accident: रस्त्यालगतच्या फलकाला दुचाकी धडकली, तरूण थेट झाडावर आपटला; जागेवरच मृत्यू, अपघाताचा भयंकर VIDEO

Gold Rate Today: सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वाढले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे भाव

SCROLL FOR NEXT