Whatsapp  SAAM TV
बिझनेस

META चा मोठा निर्णय, ५४ दिवसांनंतर WhatsApp बंद; नक्की काय आहे प्रकार?

Whatsapp Update : व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा निर्णय जाणून घ्या. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, जुने ॲप 54 दिवसांनंतर काम करणे बंद करेल.कंपनीने याबाबतची माहिती युजर्सना नोटिफिकेशन द्वारे दिली आहे.

Shreya Maskar

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात व्हॅाट्सॲप, इंस्टाग्राम खूप महत्त्वाचे आहे. सर्वच युजर्स व्हॉट्सॲपचा जास्तीतजास्त वापर करत असतात. व्हॉट्सॲपमुळे सर्वच आपल्या जवळच्या व्यक्तींशी चॅट करत असतात. याच युजर्ससाठी व्हॉट्सॲप नवनवीन फीचर्स , अपडेट घेऊन येत आहे. ज्यामुळे युजर्सनां त्याचा फायदा होतो. या फीचर्समुळे काम सिंपल होते. यासाठी व्हॉट्सॲप कंपनीने मॅक प्रोडक्टबाबत काही निर्णय घेतले आहे. ज्यामध्ये त्यांनी डेस्कटॅाप ॲप , मॅकचे इलेक्ट्रॉन बेस्ट आणि नवीन नेटिव्ह ॲप - कॅटलिस्ट बदलण्याचे सांगितले आहे. त्यांनी मॅकचे हे सर्व ॲप नवीन रुपात अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वाची माहिती WABetaInfoच्या रिपोर्टने दिली आहे.

व्हॉट्सॲप कंपनीने या सगळ्या नवीन अपडेटची माहिती युझर्सनां नोटिफिकेशन्सद्वारे दिली आहे. ज्यामुळे नोटिफिकेशन्स त्वरित दिसतील. WABetaInfoच्या मदतीने सांगितले की ५४ दिवस जुने ॲप काम करणार नसल्यामुळे त्या ॲप्सना बंद ठेवण्यात येईल. युजर्सना WABetaInfoच्या साहाय्याने X वर स्क्रीनशॅाट शेअर केला आहे. ज्यामध्ये कंपनीचे मॅकवरील इलेक्ट्रॅानिक ॲप बंद राहतील. या सर्व कारणांमुळे युजर्सनां ह्या गोष्टीची माहिती सूचित केली आहे.

मॅक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवरील व्हॉट्सॲप वापरण्यासाठी युजर्सनां खूप गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. ज्यामध्ये त्यांना मॅक डेस्कटॅापवरचं नवीन व्हॉट्सॲप वापरावं लागेल. वापर करणाऱ्या युजर्ससाठी नवीन कॅटलिस्ट ॲप स्विच सुरु केलं जाईल. स्विच केलेल्या नवीन ॲपमध्ये युजर्सचा कॉन्टॅक्ट लिस्ट आणि चॅटचा डाटा सेव्ह करण्यात येईल. हा इलेक्ट्रॉनिक ॲप सिंगल ऑपरेटिंग सीस्टमवर काम करणारा आहे. ज्याने आपण एखादा ॲप सहजपणे तयार करु शकतो.

नवीन अपडेटमुळे कंपनी युजर्सनां Mac OS चे नवीन फीचर्स बघण्याचे आश्वासन देत आहे. ज्यामुळे युजर्सनां खूप फायदा होणार आहे. कॅटॅलिस्ट ॲपद्वारे वापर करणाऱ्या युजर्सनां सुरक्षा दिली जाणार आहे. माहितीनुसार , ऑक्टोबरच्या अखेरिस हा इलेक्ट्रॉनिक फ्रेमवर्क असणारा ॲप बंद केला जाईल. ज्यामुळे युजर्सनां व्हॉट्सॲप वेबसाईट वापरावी लागेल. त्या वेबसाईटवरुन वापर करते मॅक कॅटॅसिल्ट डेस्कटॉप ॲप डाउनलोड करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT