Surabhi Jayashree Jagdish
धोदाडी धबधबा हा पालघर जिल्ह्यातील बोईसरजवळील एक सुंदर, निसर्गरम्य आणि तुलनेने कमी गर्दीचं ठिकाण आहे.
पावसाळ्यात हा धबधबा भरभरून वाहतो आणि आसपासचा परिसर हिरवागार होतो.
ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
धबधब्याच्या पायथ्याशी छोटं कुंड तयार होतं ज्यात पर्यटक भिजण्याचा आनंद घेतात.
सर्वप्रथम मुंबई किंवा विरारहून बोईसर रेल्वे स्थानक गाठा. त्यानंतर बोईसरहून चिखलेपाडा गाव गाठा.
चिखलेपाडा हे गाव धोदाडी धबधब्याच्या अगदी जवळ आहे. चिखलेपाडा गावापर्यंत वाहनाने जाता येते. गावातून साधारण पंधरा ते वीस मिनिटं चालत धबधब्याजवळ जाता येतं
वाट जंगलातून जाते पण स्पष्ट आणि सोपी आहे. स्थानिक लोकांकडून वाट विचारल्यास मार्गदर्शन मिळतं.
मुंबई ते बोईसर अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. बोईसर ते चिखलेपाडा सुमारे १० ते १५ किलोमीटर असून एकूण अंतर मुंबईहून सुमारे ११५ किलोमीटर आहे. एकूण हा साडेतीन तासांचा प्रवास आहे.