Know the difference between CTC and In-Hand Salary Saam Tv
बिझनेस

CTC आणि In-Hand सॅलरीमध्ये काय फरक आहे, जाणून घ्या

CTC and In-Hand Salary: सीटीसी आणि इन हॅन्ड सॅलरीत काय फरक आहे? याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Satish Kengar

Know the difference between CTC and In-Hand Salary:

कोणत्याही नवीन कंपनीत नवीन नोकरीमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पगार निश्चित केला जातो. या अंतर्गत संबंधित कंपनीचे एचआर तुम्हाला सीटीसी आणि इन हॅन्ड सॅलरीची माहिती देतात. ज्यावरून तुमचा मासिक पगार ठरवला जातो. तुम्हाला तुमच्या सीटीसीबद्दल दरवर्षी माहिती दिली जाते. तसेच सीटीसी नेहमीच सॅलरीपेक्षा जास्त असतो. मात्र इन हॅन्ड सॅलरी कमी असते. हे असं का असतं? सीटीसी आणि इन हॅन्ड सॅलरीत काय फरक आहे? याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सीटीसी म्हणजे काय?

सीटीसी म्हणजे कॉस्ट टू कंपनी. म्हणजे कंपनी कामाच्या बदल्यात आपल्या कर्मचाऱ्यांवर खर्च करते ती किंमत. यामध्ये बेसिक सॅलरीसह एकूण वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युईटीसह कंपनीद्वारे देण्यात आलेल्या इतर सुविधांचा समावेश होतो. त्यानंतर एक सीटीसी तयार केला जातो. सीटीसी दरवर्षी ठेवलं जातं. ज्याला वार्षिक पॅकेज देखील म्हणतात. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीटीसी अंतर्गत कर्मचाऱ्याला संपूर्ण रक्कम दिली जात नाही. उलट पीएफ आणि वैद्यकीय विम्यासह इतर गोष्टींसाठी सॅलरीतून एक रक्कम कापली जाते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना मासिक आधारावर पूर्ण रक्कम दिली जात नाही.   (Latest Marathi News)

इन हॅन्ड सॅलरी म्हणजे काय?

इन हॅन्ड सॅलरी म्हणजे सर्व प्रकारच्या कपातीनंतर कंपनीकडून तुम्हाला मासिक दिली जाणारी रकम असते. ही रक्कम तुमच्या सीटीसी रकमेपेक्षा कमी असते. सर्व कपातीनंतर कंपनीकडून तुम्हाला मासिक एक निश्चित रक्कम दिली जाते.

सीटीसी आणि इन हॅन्ड सॅलरीत काय फरक असतो?

सीटीसी सॅलरी कंपनीने कर्मचाऱ्यावर खर्च केलेली संपूर्ण रक्कम असते. पीएफ, वैद्यकीय आणि इतर सुविधांची रक्कम सीटीसी पगारात समाविष्ट केली जाते. तर हे या सर्व कपटी केल्यानंतर जी रक्क्म कर्मचाऱ्यांना दिली जाते त्याला इन हॅन्ड सॅलरी म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update: सरकारनं e-KYC करण्याचे का दिले निर्देश? बहिणींनो,छोट्याशा चुकीनं बँक खातं होईल रिकामं

loan waiver : मोठी बातमी! शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी नाहीच, पण सरकार घेणार मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर

Jio Recharge Plan: जिओची नवी ऑफर! गेमिंग प्लॅनची सुरुवात फक्त ४८ रुपयांपासून; डेटा, कॉलिंग अन् दमदार ऑफर्स

Red Alert : पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शक्य असेल तर घरात राहा

SCROLL FOR NEXT