Post Office Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट आहे ही पोस्टाची योजना, गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा

Post Office Senior Citizen Scheme: पोस्ट ऑफिसच्या योजना या गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जातात. पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना चालवल्या जातात. यातच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना चालवली जाते.
Post Office Senior Citizen Scheme
Post Office Senior Citizen SchemeSaam Tv
Published On

Post Office Senior Citizen Scheme:

पोस्ट ऑफिसच्या योजना या गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जातात. पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना चालवल्या जातात. यातच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना चालवली जाते. ज्यात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. या योजनेचे नाव सिनियर सिटीझन सेव्हिंग योजना आहे.

निवृत्तीनंतर वृद्धांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे अनेकदा दिसून आलं आहे. अशातच तुम्हाला निवृत्तीनंतर मिळालेले पैसे, तुम्ही पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटीझन सेव्हिंग योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला जबरदस्त परतावा मिळू शकतो. सध्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला 7.2 टक्के व्याज दिले जात आहे. जे अनेक बँकांच्या एफडी दरांपेक्षा जास्त आहे. याशिवाय या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला अनेक मोठे फायदेही मिळू शकते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Post Office Senior Citizen Scheme
Porsche कार डिझाइन असलेला स्मार्टफोन लॉन्च, जबरदस्त फीचर्ससह इतकी आहे किंमत

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन सेव्हिंग योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला बाजारातील कोणत्याही प्रकारच्या जोखमीचा सामना करावा लागणार नाही. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे.  (Latest Marathi News)

या योजनेत तुम्ही किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करू शकता. तर गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर सूटही मिळते.

Post Office Senior Citizen Scheme
Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! बिहारमधील महत्त्वाचा पक्ष झाला काँग्रेसमध्ये विलीन; राजकीय समिकरणं बदलणार

तुम्ही आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा लाभ देखील घेऊ शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 5 वर्षांचा लॉक इन पीरियड मिळतो.

ही एक अल्प बचत योजना आहे. ज्याला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. ज्येष्ठ नागरिक त्यांच्या निवृत्तीनंतरचे पैसे या योजनेत गुंतवू शकतात आणि त्यावर चांगला परतावा मिळवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com