Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! बिहारमधील महत्त्वाचा पक्ष झाला काँग्रेसमध्ये विलीन; राजकीय समिकरणं बदलणार

Jan Adhikar Party Merge With Congress: लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत बिहारमधील राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांचा जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळण्याची शक्यता आहे.
Rajesh Ranjan
Rajesh RanjanSaam Digital
Published On

India's Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत बिहारमधील राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांचा जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळण्याची शक्यता आहे. बिहारमधील जागावाटपा आधी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय झाला होता. पप्पू यादव यांच्या पत्नी रंजिता रंजन या काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. बिहारमधील भारत आघाडीत जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठकांचा सपाटा सुरू आहे.

हा एक ऐतिहासिक क्षण आहे, देशाचं आणि राज्याचं राजकारण बदलण्याची ताकद आली आहे, असं काँग्रेस नेते पवन खेडा यांनी म्हटलं आहे. तसंत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पप्पू यादव बिहारमध्ये निवडणूक लवणार असल्याची चर्चा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कन्हैया कुमार आणि पप्पू यादव यांच्या जागांवरून 'इंडिया' आघाडीत चर्चा सुरू आहे. मंगळवारी पप्पू यादव यांनी आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये बिहारमध्ये भाजपला हद्दपार करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. पप्पू यादव यांनी पूर्णियातून आणि बेगुसरायमधून कन्हैया कुमार यांनी निवडणूक लढवावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे, मात्र राजदने अद्याप यावर संमती दर्शवलेली नाही.

Rajesh Ranjan
Lok Sabha Election 2024 : ४०० पारसाठी भाजपसमोर असेल खडतर आव्हान; कशा असतील उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुका?

बिहार लोकसभेत आरजेडी 28, काँग्रेस 9 आणि डावे पक्ष 3 जागांवर निवडणूक लढवू शकतात. त्याचवेळी राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) पशुपती पारस आणि विकासशील इन्सान पक्षाचे मुकेश साहनी हे देखील इंडिया अलायन्सच्या संपर्कात आहेत. अशा स्थितीत जागावाटपात काही बदल होऊ शकतात. पशुपती पारस एनडीएमधून बाहेर पडले आहेत. अशा स्थितीत त्याच्या पुढील वाटचालीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.सीमांचल, कोसी, मिथिलांचलमध्ये इंडिया आघाडीला यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. एकत्रित निवडणूक लढवून भाजपला हद्दपार करणार आहे, असं RJD सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर पप्पू यादव म्हणाले होते.

Rajesh Ranjan
Maharashtra Lok Sabha Election : अकोल्यात भाजपची महत्त्वाची बैठक; उमेदवारांबाबत काय घेणार निर्णय? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com